आंब्यांचा इतिहास माहीत नाही तर हे वाचाच

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

कवी कुलगुरू कालिदासाच्या साहित्यातून वसंतागमनसूचक जी आम्रमंजरी तिचा उल्लेख आल्याशिवाय रहात नाही. बुद्धधर्मीय प्रवासी आणि संगयन यांच्या प्रवासवर्णनांत आम्रसारिकेनें गौतम बुद्धांना विश्रांतिकरिता किंवा तपश्‍चर्येकरिता एक आम्रवन नजर केले होते. मुहम्मद तुघलकाच्या काळातील तुर्की कवी अमीर खुसरो यांनी आम्र नंदनवनीच विभूषण । श्रेष्ठ हिंद फळांतिल हे फळ ।। अन्य फळे जरि पक्क । मधुर आम्र जरी न परिपक्व, असे वर्णन केले आहे. 

सोलापूर ः फळांचा राजा आंब्याची थोरवी आता केवळ चवीपुरती नाही तर ती इतिहासातील अनेक कालखंडात उल्लेखली जात आहे. कवी कालीदास, उपनिषदे व रामयाण, महाभारता नंतर सर्वच काळात असलेले आंबा फळाचे वर्णन हा या फळाचे सांस्कृतीक महत्व अधोरेखीत करतो. 

हेही वाचा ः जनता मरणाच्या दारात, सरकार मात्र आपल्या घरात 

कवी कुलगुरू कालिदासाच्या साहित्यातून वसंतागमनसूचक जी आम्रमंजरी तिचा उल्लेख आल्याशिवाय रहात नाही. बुद्धधर्मीय प्रवासी आणि संगयन यांच्या प्रवासवर्णनांत आम्रसारिकेनें गौतम बुद्धांना विश्रांतिकरिता किंवा तपश्‍चर्येकरिता एक आम्रवन नजर केले होते. मुहम्मद तुघलकाच्या काळातील तुर्की कवी अमीर खुसरो यांनी आम्र नंदनवनीच विभूषण । श्रेष्ठ हिंद फळांतिल हे फळ ।। अन्य फळे जरि पक्क । मधुर आम्र जरी न परिपक्व, असे वर्णन केले आहे. 

हेही वाचा ः सोलापुरातून या हवाई वाहतूकीला परवानगी 

लेडी ब्रॅसी या नावाच्या स्त्रीने आंब्याला फळांचा राजा असे वर्णन केले आहे. इतर कोणत्याही फळापेक्षा आंबे श्रेष्ठ आहेत असे प्रसिद्ध इतिहासकार जॉन फ्रायरने म्हटले आहे. हॅमिल्टनने गोव्याच्या आंब्याला श्रेष्ठ म्हटले आहे. अमेरिकन फलसंवर्धनशास्त्रज्ञ वुइलसन्‌ पोपेनो म्हणतात की आंब्याची स्निग्ध व खमंग रुची, त्याचा मोहक रंग या गुणांमुळे या फळाला अमेरिकेच्या बाजारात मोठे स्थान आहे. 
वास्को दि गामा जेव्हा प्रथम हिंदुस्थानात आला तेव्हा कालिकतला प्रचलित असलेल्या आंब्यास त्याने "मांगाय' असे म्हटले. वनस्पतिशास्त्रातील मॅंगिफेरा इंडिका या आंब्याच्या नावापैकी इंडिका या शब्दावरून या फळाचे मूळस्थान हिंदुस्थान देश असावे. 
आंब्याचा उल्लेख बृहदारण्यकोपनिषदामध्ये देखील मिळतो. लंकेत सापडलेल्या आम्रकानन (आंबराई) असा उल्लेख रामायणात आढळतो. इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम यांच्या अभ्यासानुसार, महाभारत काळात आंब्यांची झाडे थोड्या वर्षांत म्हणजे पाच वर्षांत फळ कसे देतील या विषयीची कला लोकांना माहिती होती. ख्रिस्ती शकाच्या अगोदर सुमारे चार हजार वर्षे इतक्‍या प्राचीन कालापासून मनुष्य प्राणी ज्या फळझाडांची लागवड करीत आला आहे त्यापैकीच आंबा हेही फळ असावे असे अल्फॉन्स डी कॅंडोल यांचे मत आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mango having great historical importance