मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून रोखला सोलापूर-पुणे महामार्ग; पाण्याच्या टाकीवर आत्मदहनाचा प्रयत्न फसला 

तात्या लांडगे 
Friday, 11 September 2020

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणवर्ग नाराज झाला होता. त्याचेच पडसाद आज सोलापुरात उमटल्याचे पाहायला मिळाले. 

सोलापूर : आरक्षणाच्या स्थगिती विरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निर्णयाचा विरोध केलाय. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बाळेनजीक टायर जाळून निषेध व्यक्त केलाय. मराठा आरक्षण जोवर मिळत नाही तोवर मराठा समाजातील युवक शांत बसणार नसून, गनिमीकावा पद्धतीने हे आंदोलन करतच राहणार असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांनी दिलीय. 

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणवर्ग नाराज झाला होता. त्याचेच पडसाद आज सोलापुरात उमटल्याचे पाहायला मिळाले. 

आरक्षणाच्या निर्णयाविरोधातील निर्णयानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी अवंतीनगर येथील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. मात्र पाण्याच्या टाकीवर चढण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते, त्यामुळे आंदोलनाचा हा प्रयत्न फसल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दुपारच्या सत्रात पुन्हा सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून आपला रोष व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले. 

दरम्यान, टायर जाळल्यानंतर कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत जवळपास अर्धा तास महामार्ग रोखून ठेवला होता. त्या वेळी ऍम्ब्युलन्स आल्यानंतर मात्र कार्यकर्ते रस्ता मोकळा करून तेथून परागंदा झाले. विशेष म्हणजे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती; मात्र कोणतीही पोलिस यंत्रणा तेथे पोचली नव्हती. 

कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप 
आरक्षणाच्या स्थगितीविरोधात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न असफल झालाय. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यभर याविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण वर्ग नाराज झाला होता. त्याचेच पडसाद आज सोलापुरात उमटल्याचे पाहायला मिळाले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha activists burn tires to protest against reservation moratorium