मार्डी, करकंब, वांगीत सापडले नवे कोरोनाबाधित रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

तालुकानिहाय बाधितांची संख्या 
अक्कलकोट-66, बार्शी-49, करमाळा-1, माढा-8, माळशिरस-5, मंगळवेढा-0, मोहोळ-17, उत्तर सोलापूर-23, पंढरपूर-9, सांगोला-3, दक्षिण सोलापूर-132, एकूण-313. 

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. आज एकूण 20 जणांचे अहवाल पॉढिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 313 इतकी झाली आहे. आज मार्डी (ता. उत्तर सोलापूर), वांगी (ता. दक्षिण सोलापूर) व करकंब (ता. पंढरपूर) या तीन गावांमध्ये नव्याने कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. 

जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने आज बाधित झालेल्या रुग्णांचा अहवाल दिला आहे. आज एकूण 141 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 121 जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आढळून आले तर 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचबरोबर आज करजगी (ता. अक्कलकोट) येथील 46 वर्षाची एक व्यक्ती मयत झाली आहे.आज मार्डी येथे एक पुरुष, कुंभारी येथे एक पुरुष, एक स्त्री, बोरामणी येथे एक स्त्री, मुळेगाव, वांगी येथे प्रत्येकी एक पुरुष, करजगी येथे एक पुरुष, बुधवारपेठ अक्कलकोट येथे तीन पुरुष एक स्त्री, आदर्शनगर मोहोळे येथे एक पुरुष, कळसेनगर मोहोळ येथे एक स्त्री, वैराग येथे एक स्त्री एक पुरुष, उपळाई ठोंगे (ता. बार्शी) येथे दोन स्त्रिया, सुर्वेवस्ती आगळगाव (ता. बार्शी) येथे पुरुष, करकंब येथे एक पुरुष, संभाजी चौक पंढरपूर येथे एक पुरुष कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 313 इतकी झाली आहे. कोरोनामुक्त होऊन 130 जण घरी गेले आहेत. अद्यापही 167 जण रुग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत कोरोनाने 16 जणांचे बळी घेतले आहेत. अद्यापही 36 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mardi, Karkamb, wangi new corona-infected patients found