शिरखुर्मा साहित्य खरेदीसाठी बाजार फुलला

शिरखुर्मा साहित्य खरेदीसाठी बाजार फुलला

सोलापूरः शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळपासून रमजान ईदनिमित्त हजारो लोकांनी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली. पोलिसांनी नागरिकांना खरेदी करता यावी यासाठी दुचाकी व इतर वाहने थांबवून पादचाऱ्यांसाठी रस्ते मोकळे केले. 

शहरात आज रमजान ईदचा बाजार सकाळ सातपासून सुरू झाला. किडवाई चौक ते पेंटर चौक परिसर फुलून गेला होता. बाजारातील मुख्य रस्त्यांवर देखील मोठी गर्दी झाली होती. लोकांनी फळे, मिठाई, किराणा व भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. पादचाऱ्यांची संख्या जास्त असल्याने रस्त्यावर कुठे जागा शिल्लक मिळत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी दुचाकी व इतर वाहने अडवली. काही दुचाकीस्वारांवर कारवाई देखील करण्यात आली. अचानक पोलिसांनी केलेल्या कारवाईने दुचाकीचालक त्रस्त झाले होते. पण, हातात पिशव्या घेऊन पायी निघालेल्या लोकांना त्यामुळे खरेदीसाठी दुकानापर्यंत पोचता आले. 

शिरखुर्म्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी देखील दुकानांवर गर्दी होती. काजू, बदाम या प्रकारचा सुका मेवा शिरखुर्म्यासाठी वापरला जातो. तसेच दुधाची खरेदी देखील नागरिकांनी केली. रमजान ईदसाठी जादा दूध देखील मागवण्यात आले आहे. 
जाकीर मुल्ला यांनी सांगितले, की आम्ही रमजान ईदसाठी गरजेच्या वस्तू खरेदी केल्या आहेत. महिनाभर चाललेल्या रमजान महिन्याच्या उपवासाची सांगता रमजान ईदमुळे होत आहे. लॉकडाउनमुळे आम्ही आमच्या घरातच प्रार्थना (नमाज) करून हा सण साजरा करणार आहोत. तर अफजल सय्यद यांनी सांगितले, की बाजारात गर्दी होण्यापूर्वी थोडे आधी शिरखुर्म्याचे साहित्य खरेदी केले आहे. आता घरातच प्रार्थना (नमाज) केल्यानंतर घरीच थांबणार आहोत. तसेच लॉकडाउनमुळे बाहेर जायचे नसल्याने फोनवर सर्वांना शुभेच्छा देणार आहोत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com