grain.jpg
grain.jpg

रोजीरोटी वाल्यांचे स्वस्त धान्यासाठी हाल

सोलापूरः कोरोना संकटात मजुरासह सर्वच लोकांचे अन्नधान्याचे हाल होत असताना स्वस्त धान्य वाटपातील घोळ उघड्यावर आले आहेत. अनेक आर्थक दुर्बल घटकातील नागरिकांना सर्रास जादा उत्पन्न गटासाठी असलेल्या केशरी रंगाच्या शिधापत्रिका वाटप झाल्याचे दिसून आले. रोजची कमाई बंद झालेल्या या लोकांना चुकीच्या शिधापत्रिकामुळे धान्यापासून वंचित राहण्याचे वेळ आली. या मुळे प्रत्यक्षात गरजूसाठी धान्य असून देखील दुकानदारांनी ते वाटप न केल्याने शासकीय अधिकाऱ्याकडे मोठ्या प्रमाणात धान्य देण्याच्या मागण्या होऊ लागल्या आहेत. 

स्वस्त धान्य दुकानात अंत्योदय योजना, पिवळे कार्ड धारकांना आर्थिक उत्पन्न गटानुसार जादा धान्य मिळते. केशरी व पांढरे कार्डधारकांना काही प्रमाणात कमी धान्य मिळते. जादा आर्थिक उत्पन्न गृहीत धरून ही तरतूद करण्यात आली आहे. 

मात्र मुळातच अनेक आर्थिकदृष्ट्या गरजू लोकांना चक्क केशरी कार्डाचे वाटप करण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात धान्यासाठी मोठे हाल झाले व शासनाने तीन महिन्यांचे स्वस्त धान्य देण्याचे आदेश काढले. मात्र, धान्याचे संकट आल्याने शिधापत्रिकांचा घोळ उघडकीस आला. अनेक कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या ग्राहकांना केशरी शिधापत्रिका देण्यात आल्या. आता या शिधापत्रिकामुळे जास्त गरज असूनही या ग्राहकांना धान्यच मिळाले नाही. तेव्हा या ग्राहकांनी चौकशी केली तर ही शिधापत्रिका तहसीलमधून बदलून आणा अशी उत्तरे देण्यात आली. लॉकडाउनमध्ये कुठेही झेरॉक्‍स दुकान उघडे नाही तसेच शिधापत्रिका बदलून देण्याचे काम ही करणे अशक्‍य झाले होते. तेव्हा या ग्राहकांना दुकानदाराकडून 12 रुपये किलो व आठ रुपये किलो दराने तांदूळ व गहू विकत घेण्याची वेळ आली. 
शिधापत्रिका बदलल्याचा पुरेपूर फायदा ग्राहकाला न होता दुकानदारालाच होत असल्याची उदाहरणे या वेळी उघडकीस येत आहेत. 
शासनाने ज्यांना शिधापत्रिका नाही त्यांना देखील धान्य द्यावे, अशी सूचना केलेली होती. पण त्याचा उपयोग झाला नाही. उत्पन्न गटानुसार शिधापत्रिका नसल्याने मोठ्या संख्येने लाभार्थींना धान्य वाटपापासून वंचित राहण्याची वेळ आली. 
गेल्या अनेक वर्षांत स्वस्त धान्य दुकानावर ग्राहकांनी लॉकडाउनमुळे सर्वाधिक मागणी नोंदवत चकरा मारल्या. मात्र, शिधापत्रिकाच्या घोळाने लॉकडाउनच्या संकटात धान्याची मदत पुरेशा प्रमाणात मिळाली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com