पती म्हणाला....तुला मुल होत नाही, तुझ्यातच दोष आहे 

family Violence
family Violence

सोलापूर : तुला मुलबाळ होत नाही...तु वांज असून तुझ्यात दोष आहेत असे म्हणून विवाहितेचा छळ केल्याची घटना सोलापुरातील न्यू पाच्छा पेठेत घडली आहे. पतीसह सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने जेलरोड पोलिस ठाणे गाठले. त्यानुसार पती, सासू व दिराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सोलापुरातील 35 वर्षीय विवाहितेचा काही वर्षांपूर्वी अशोक चौकातील राजशेखर येलगेटी यांच्याशी झाला. मात्र, विवाहाला खूप वर्षे होऊनही मुल होत नसल्याने पतीसह सासरच्यांनी तिला त्रास दिला. सततचा त्रास अनावर झाल्याने विवाहितेने पतीसह सासू व दिराविरुध्द पोलिसांत फिर्याद दिली आहे. जेवण नीट करता येत नाही, जेवणात सतत कमी- अधिक मीठ टाकतेस म्हणून मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादीचा पती राजशेखर सत्यनारायण येलगेटी, सासू अंबुबाई येलगेटी, दिर प्रशांत येलगेटी या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


चोरट्यांनी लांबविला ट्रक 
अक्‍कलकोट रोडवरील अंबिका टायर दुकान परिसरातील सादूल पेट्रोल पंपाजवळ राहूल रावसाहेब पाटील (रा. सालेश्‍वर सोसायटी, नवीन आरटीओ कार्यालयासमोर) यांनी सोमवारी (ता. 20) ट्रक उभा केला. रात्री 11 च्या सुमारास अज्ञात चोरट्याने तो पाटील यांच्या समंतीविनाच लांबवला. या प्रकरणी पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी आता त्या चोरट्याचा शोध सुरु केला आहे. ट्रकची अंदाजित किंमत सुमारे 17 लाख रुपये होती, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


मरणास कारणीभूत ठरलेल्या दुचाकीस्वाराविरुध्द गुन्हा 
सोलापुरातील मोतीवाला गोडाऊनसमोरील रस्ता दुभाजक ओलांडताना ओंकार अविनाश घोडके (रा. मजरेवाडी रोड, आनंद नगर भाग-एक) याच्याकडील दुचाकीने (एमएच-13, डीएच-0109) इम्रान अकबर चाऊस (वय-40) यांना धडक दिली. आसरा चौक ते विमानतळ रोडवर ही घटना रविवारी (ता. 19) घडली. अपघातानंतर इम्रान यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर इम्रान यांचे बंधू इरफान अकबर चाऊस यांनी ओंकार घोडके याच्याविरुध्द विजापूर नाका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com