कोरोनाच्या तणावातून विवाहितेने घेतला गळफास 

तात्या लांडगे 
Saturday, 29 August 2020

शेळगी परिसरातही कोरोनाचे अनेक रुग्ण आजवर आढळले आहेत. या परिसरातील माकणे प्लॉटमध्ये राहणाऱ्या ज्योती वानकर यांना सासऱ्याचा अचानक मृत्यू होणे ही घटना जिव्हारी लागली होती. त्यांच्या बहिणीलाही त्या सतत दूरध्वनीवरून याबाबत बोलत होत्या. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्याचेही त्यांनी टेन्शन घेतले होते, असे पोलिसांना त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. 

सोलापूर : शहरातील कोरोनाने अनेक कुटुंबांतील कर्त्या पुरुष - महिलांचा बळी घेतला आहे. दरम्यान, जुलै महिन्यात अचानकपणे आजारी पडलेल्या सासऱ्याचा मृत्यू झाल्याचा धक्‍का सहन न झाल्याने आणि कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाल्याने तणावातून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 

ज्योती स्वप्नील वानकर (वय 30) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेतल्याची माहिती जोडभावी पोलिसांनी दिली. 
शेळगी परिसरातही कोरोनाचे अनेक रुग्ण आजवर आढळले आहेत. या परिसरातील माकणे प्लॉटमध्ये राहणाऱ्या ज्योती वानकर यांना सासऱ्याचा अचानक मृत्यू होणे ही घटना जिव्हारी लागली होती. त्यांच्या बहिणीलाही त्या सतत दूरध्वनीवरून याबाबत बोलत होत्या. दरम्यान, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. त्याचेही त्यांनी टेन्शन घेतले होते, असे पोलिसांना त्यांच्या नातेवाइकांनी सांगितले. 

तणावातूनच त्यांनी राहत्या घरी गुरुवारी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास गळफास घेतला. त्यानंतर जोडभावी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई आर. एस. माने यांनी व त्यांच्या नातेवाइकांनी त्यांना बेशुद्ध आवस्थेत श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र करणकोट व पोलिस उपनिरीक्षक प्रवीण दाईंगडे यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A married woman committed suicide due to corona stress