महापौरांचा प्रभाग ऑरेंज झोनमध्ये ! प्रभागात उरले आता आठ रुग्ण 

तात्या लांडगे
Friday, 13 November 2020

ज्येष्ठांवर ठेवला वॉच; मृत्यू रोखण्यात यश 
प्रभागातील नागरिक कोरोनापासून दूर राहावेत म्हणून गरजूंना या काळात धान्य वाटप केले. आर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. त्याचवेळी घरोघरी जनजागृती करीत वयस्क व लहान मुले सुरक्षित राहतील, याकडे लक्ष दिले. कोरोना वॉरिअर्सच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांवर वॉच ठेवला. त्यामुळे आता हा प्रभाग कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करू लागला आहे. 
- श्रीकांचना यन्नम, महापौर 

सोलापूर : शहरातील 19 नंबरचा प्रभाग कोरोनामुक्‍त झाला असून 15 प्रभाग कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहेत. त्यात महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या प्रभागात आठ रुग्ण उरले आहेत. नगरसेवकांनी स्वत: कोरोना पॉझिटिव्ह होऊन लोकसेवा केली. तत्पूर्वी, नगरसेवकांनी केलेल्या जनजागृतीवर भर देत मास्क, धान्य वाटप केले. रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट, आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून संशयितांची वैद्यकीय तपासणी केली. त्यामुळे 70 हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या प्रभागातील कोरोना रुग्णांची संख्या तीनशेच्या आत राहिली.

 

प्रभागाविषयक ठळक बाबी... 

 • आतापर्यंत 297 व्यक्‍ती पॉझिटिव्ह 
 • एकूण रुग्णांपैकी 274 जणांची कोरोनावर मात 
 • आतापर्यंत एकूण 15 रुग्णांचा गेला बळी 
 • सद्यस्थितीत प्रभागात उरले आता आठ रुग्ण

 

शहरात नोव्हेंबरमध्ये 11 हजार 746 संशयितांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यात 285 रुग्ण आढळले असून 14 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रभाग 18 मधील इंदिरा नगर, मदर इंडिया झोपडपट्टी, मार्कंडेय नगर, आदर्श नगर, श्रीराम नगर, वेणुगोपालनगर या भागात दाट लोकवस्ती आहे. सुरवातीला बहुतांश प्रतिबंधित क्षेत्र याच प्रभागात होते. मात्र, सुरक्षिततेसाठी नागरिकांनी घराबाहेर न पडता, त्यांना घरबसल्या नगरसेवकांनी मदत केली. फिव्हर ओपीडीच्या माध्यमातून लोकांची वैद्यकीय तपासणी केली. व्हॉटसअप ग्रूपच्या माध्यमातून दररोज एकमेकांशी संवाद साधून प्रभागातील प्रत्येक घडामोडींवर नगरसेवकांनी वॉच ठेवला. त्यामुळे हा प्रभाग कोरोनामुक्‍त होऊ लागला आहे. 

 

  ज्येष्ठांवर ठेवला वॉच; मृत्यू रोखण्यात यश 
  प्रभागातील नागरिक कोरोनापासून दूर राहावेत म्हणून गरजूंना या काळात धान्य वाटप केले. आर्सेनिक अल्बम गोळ्या, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. त्याचवेळी घरोघरी जनजागृती करीत वयस्क व लहान मुले सुरक्षित राहतील, याकडे लक्ष दिले. कोरोना वॉरिअर्सच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांवर वॉच ठेवला. त्यामुळे आता हा प्रभाग कोरोनामुक्‍तीकडे वाटचाल करू लागला आहे. 
  - श्रीकांचना यन्नम, महापौर 

  फिवर ओपीडी, ऍन्टीजेन टेस्टद्वारे केली वैद्यकीय तपासणी 
  सुरवातीला जनजागृती, त्यानंतर पाच हजारांहून अधिक नागरिकांची रॅपिड ऍन्टीजेन टेस्ट केली. प्रभागात 11 फिव्हर ओपीडी शिबिरे घेतली. त्यातून प्रभागातील 12 हजार संशयितांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर भारत नगर, इंदिरा नगर, तक्षशिल नगर, लेप्रसी कॉलनी या भागातील गरजूंना घरपोच धान्य वाटप केले. बृहन्मठ होटगी संस्थेतर्फेही अडीच महिने अन्नदान करण्यात आले. 
  - शिवानंद पाटील, नगरसेवक


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Mayor's Ward in Orange Zone! There are now eight patients left in the ward