दिवाळखोरांचे कर्ज माफ करता मग शेतकऱ्यांचे का नाही? "या' माजी आमदारांनी केला सरकारला सवाल 

श्रीनिवास दुध्याल 
Thursday, 23 July 2020

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स व अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी कामगार व शेतकरी यांच्या देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. त्याअनुषंगाने सोलापुरात माजी आमदार श्री. आडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी आंदोलन करण्यात आले. श्री. आडम पुढे म्हणाले, या लक्षवेधी आंदोलनात शेतकरी, विद्यार्थी, युवा, महिला व श्रमिक कष्टकरी एकजूट दाखवून सहभागी झाले. 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनहिताच्या लढाईत सर्व तयारीने उतरण्याचा निर्धारही करण्यात आला. 

सोलापूर : देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देऊन, रोजगारनिर्मिती करून देश प्रगतिपथावर नेण्याची खोटी, फसवी प्रलोभने दाखणाऱ्या, सरकारकडून कर्जे घेऊन अब्जावधींचा नफा मिळवून नंतर कंपन्या तोट्यात आल्याचे सांगणाऱ्या व देशाला भुकेकंगाल बनवणाऱ्या नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारख्या दिवाळखोरांचे सरकारी तिजोरीतून अब्जावधी रुपये माफ करणारे सरकार शेतकऱ्यांचे कर्ज का माफ करत नाही? त्यांच्या शेतमालाला भाव का देत नाही? स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी का लागू करत नाही? शेतकऱ्यांबाबत सरकारचा दुजाभाव का, असा सवाल मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी केला. 

हेही वाचा : और हड्डी गले में फंस गई..! बोकडाच्या जेवणामुळे उघडकीस आली कैदी, पोलिस, गावकरी आणि कोरोनाची धक्कादायक कहाणी; वाचा सविस्तर... 

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स व अखिल भारतीय किसान सभा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी कामगार व शेतकरी यांच्या देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. त्याअनुषंगाने सोलापुरात माजी आमदार श्री. आडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सिटूचे राज्य महासचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी आंदोलन करण्यात आले. श्री. आडम पुढे म्हणाले, या लक्षवेधी आंदोलनात शेतकरी, विद्यार्थी, युवा, महिला व श्रमिक कष्टकरी एकजूट दाखवून सहभागी झाले. 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या जनहिताच्या लढाईत सर्व तयारीने उतरण्याचा निर्धारही करण्यात आला. 

हेही वाचा : प्रक्षाळ पूजेचा वाद पेटला..! श्री विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांचा काम बंदचा इशारा; काय केली मागणी? वाचा 

आंदोलनातील प्रमुख मागण्या 
मार्च-डिसेंबर या काळातील संपूर्ण वीजबिल माफ करा. मनरेगाची कामे मागेल त्याला वर्षाकाठी 200 दिवस प्रतिदिन 600 रुपये मजूरी द्या. ही योजना शहरातील बेरोजगार तरुणांसाठीही सुरू करा. शेतीमालास हमीभाव द्या आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा. सार्वजनिक उद्योगधंद्यांचे खासगीकरण बंद करा व बेरोजगार तरुणांना नोकऱ्या द्या. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली खासगी शिक्षण सम्राटांची सुरू झालेली मक्तेदारी बंद करा. सर्वांना सुलभ शिक्षण देण्याचे नियोजन करा. महिलांवर होणाऱ्या अन्याय- अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई करा. बांधकाम, रिक्षा, घरेलू, विडी, यंत्रमाग, रेडिमेड, हमाल/माथाडी, कंत्राटी यासह असंघटित कामगार आणि स्वयंरोजगार करणाऱ्या व्यवसायिकांच्या मागण्यांचाही यात समावेश आहे. आदी मागण्यांचे फलक दाखवून सरकारचा लक्ष वेधले. 

या शाखांमार्फत करण्यात आले आंदोलन 
बापूजीनगर शाखा येथे माजी आमदार आडम, नगरसेविका कामिनी आडम, कुरमय्या म्हेत्रे, माशप्पा विटे, मोहन कोक्कुल, सनी शेट्टी यांनी तसेच अखिल भारतीय किसान सभा, दक्षिण सोलापूर, टाकळी, कुसूर, अक्कलकोट, बार्शी, दत्तनगर, भगवाननगर, शहीद कुर्बान हुसेन नगर, होटगी रोड, अशोक चौक, कॉ. गोदूताई परुळेकर वसाहत (कुंभारी) अ, ब, क परिसर मीनाक्षीताई साने वसाहत (कुंभारी), लष्कर, मोदी, प्रजा नाट्य मंडळ, क्रांती झोपडपट्टी, शास्त्रीनगर, डीवायएफआय, एसएफआय, इंदिरानगर, सत्यसाई नगर, विजयपूर नाका, कोनापुरे चाळ, मित्रनगर, किसाननगर, गांधीनगर, राहुल गांधीनगर, कुंभारी, देसाईनगर, मोदी हुडको.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MCP agitates in Solapur city-district for various demands