मोदी सरकारने केली दोन लाख कोटींची लूट : माकप 

MCP
MCP

सोलापूर : मोदी सरकार आपले कार्पोरेट माईंड वापरून जनतेच्या खिशाला कात्री लावत आहे. जनधन खात्यात सर्वांना पैसे टाकले, अशी अफवा उठवून सरसकट सर्व जनतेच्या श्रमाचा, घामाचा पैसा पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या रूपाने सरकारच्या तिजोरीत भरत आहेत. अर्थातच दोन लाख कोटी रुपयांची लूट सरकारने केलेली आहे, असा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांनी केला. 

माकप पॉलिट ब्यूरोच्या वतीने 29 जून हा देशव्यापी निषेध दिन पाळण्याची राष्ट्रीय हाक देण्यात आली. त्यानुषंगाने सोलापुरात पेट्रोल व डिझेलच्या अवास्तव दरवाढी विरोधात शहरातील विविध ठिकाणी माकप शाखांमार्फत इंधन दरवाढ तातडीने मागे घ्या, ही प्रमुख मागणी घेऊन सोमवारी श्री. आडम यांच्या मार्गदर्शनाखाली व माकपचे जिल्हा सचिव ऍड. एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून, काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. दत्त नगर शाखेच्या वतीने निदर्शने करताना जेलरोड पोलिसांनी माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, माजी नगसेविका सुनंदा बल्ला यांच्यासह 28 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

श्री. आडम पुढे म्हणाले, इंधन दरवाढीचा दुष्परिणाम सामान्य नागरिकांवर होत आहे. दरवाढीबाबत मोदी सरकार स्पष्टीकरण देताना म्हणते, की कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे एक लाख सहा हजार कोटी कॉर्पोरेटर कर बुडाल्यामुळे दरवाढ करावी लागत आहे. बड्या भांडवलदारांना पाच लाख 50 हजार कोटी रुपयांची सवलत सरकारी तिजोरीतून दिली गेली. या अब्जाधीशांवर एक टक्का कर लावा. लॉकडाउन कालावधीत अनेकजण बेरोजगार झाले. लोकांची उपासमार झाली, हे भयाण वास्तव असतानाही सरकार नैतिकतेतून न्याय देऊ शकले नाही. तुमच्या कटकारस्थानांना जनता लवकरच चोख उत्तर देईल. 

माकपतर्फे बापूजीनगर शाखा येथे श्री. आडम, नगरसेविका कामिनी आडम आदींसह कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यासह दत्तनगर, भगवाननगर, शहीद कुर्बान हुसेननगर, अशोक चौक, गोदूताई परुळेकर वसाहत (कुंभारी), मीनाक्षीताई साने वसाहत (कुंभारी) लष्कर, मोदी, प्रजा नाट्य मंडळ, शास्त्रीनगर, डीवायएफआय, एसएफआय, इंदिरानगर, सत्यसाईनगर, विजयपूर नाका, कोनापुरे चाळ, मित्रनगर, किसाननगर, गांधीनगर, शहापूर चाळ, देसाईनगर आदी शाखांच्या सचिव व कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com