वाचा ः का झाली जवानास बार्शीत अटक 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

बार्शी शहर पोलिस ठाण्यात ठाणे अमंलदार भांगे, मदतनीस माने, लगदिवे, ढेंगळे कर्तव्यावर कार्यरत असताना खुने रात्री 10 वाजता पोलिस ठाण्यात आला. त्याने गोंधळ घालण्यास सुरवात करताच पोलिसांनी त्यास काही तक्रार आहे का विचारले. पोलिसांचे काहीएक म्हणणे ऐकून घेत नव्हता. मद्यप्राशन करून आल्याने पोलिसांनी त्यास जाण्यास सांगितले. त्यावेळी त्याने माने यांना धक्काबुक्की केली. ठाणे अंमलदारांना मारहाण करून चापट मारली. पोलिस ठाण्यातील खुर्चीची तोडफोड करून सर्व पोलिसांना शिवीगाळ केली. 

बार्शी (जि. सोलापूर) ः रांची येथे सैन्य दलात कार्यरत असलेल्या व सुटीवर आलेल्या जवानाने मद्यप्राशन करून बार्शी शहर पोलिस ठाण्यात धिंगाणा घातला. त्याने दोन पोलिसांना मारहाण करून खुर्चीची तोडफोड केली. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळाप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. 
किरण उत्तम खुने (वय 25, रा. अलिपूर रोड, ज्ञानेश्‍वर मठ, बार्शी) असे अटक करण्यात आलेल्या जवानाचे नाव आहे. पोलिस रमेश माने यांनी फिर्याद दाखल केली. ही घटना गुरुवारी रात्री 10 वाजता घडली. बार्शी शहर पोलिस ठाण्यात ठाणे अमंलदार भांगे, मदतनीस माने, लगदिवे, ढेंगळे कर्तव्यावर कार्यरत असताना खुने रात्री 10 वाजता पोलिस ठाण्यात आला. त्याने गोंधळ घालण्यास सुरवात करताच पोलिसांनी त्यास काही तक्रार आहे का विचारले. पोलिसांचे काहीएक म्हणणे ऐकून घेत नव्हता. मद्यप्राशन करून आल्याने पोलिसांनी त्यास जाण्यास सांगितले. त्यावेळी त्याने माने यांना धक्काबुक्की केली. ठाणे अंमलदारांना मारहाण करून चापट मारली. पोलिस ठाण्यातील खुर्चीची तोडफोड करून सर्व पोलिसांना शिवीगाळ केली. 
पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या अंगावर तो धावून येत होता. त्याचा धिंगाणा सुरू असताना पोलिसांनी बळाचा वापर करून त्यास ताब्यात घेतले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत. 

जखमी तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू! 
वैराग ः बार्शी- सोलापूर रोडवर काळेगाव पाटीजवळ दोन दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या विचित्र अपघातात जखमी झालेल्या त्या युवकाचा उपचार सुरू असताना बार्शी येथे मृत्यू झाला. 
रणजित वाघमारे (वय 20, रा. पोहनेर, जि. उस्मानाबाद), असे गंभीर जखमी होऊन उपचार सुरू असताना मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. दोन दुचाकींचा समोरासमोर जोराची धडक बसून गुरुवारी पावणेतीनच्या दरम्यान हा अपघात झाला होता. यातील रामचंद्र अश्‍वमेध मोटे (रा. वाळूज, ता. मोहोळ) यांचा दोन दुचाकींनी पेट घेऊन उडालेल्या भडक्‍यात भाजून जागीच मृत्यू झाला होता. अपघातात दोन्ही दुचाकींवरील सुरतिशेन अश्‍वमेध मोटे (रा. वाळूज) व समाधान मोतीराम हाकारे (रा. पोहनेर) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर बार्शी येथे उपचार सुरू आहेत. या अपघाताची फिर्याद अशोक मुरलीधर मोटे (रा. वाळूज) यांनी वैराग पोलिसांत दिली आहे. या अपघातामुळे वैराग, वाळूज व पोहनेर येथे हळहळ व्यक्त होत आहे. 

मंगळवेढा बसस्थानकातून चोरी 
मंगळवेढा ः तालुक्‍यातील डोणज येथील महिला प्रवाशाचे एसटी बसमध्ये चढताना पिशवीत ठेवलेला 10 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना मंगळवेढा बसस्थानकात आज दुपारी घडली. याबाबत पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. नऊ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, एक हजार रुपये किमतीचा समसंग कंपनीचा मोबाइल, 700 रुपये रोख असा 10 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: militry jawan arresed in barshi