आमदार भारत भालके स्वत:चा बंगला देणार क्वारंटाईनसाठी 

MLA Bharat Bhalke will give his own bungalow for quarantine
MLA Bharat Bhalke will give his own bungalow for quarantine

पंढरपूर (सोलापूर) : सोलापूरनंतर आता पंढरपुरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यातच बाहेर गावाहून आलेल्या लोकांची संख्या देखील जास्त आहे. या पार्श्वभूमीवर पंढरपूरचे आमदार भारत भालके यांनी जिल्हा न्यायालयाजवळ असलेला दुमजली बंगला क्वारंटाईसाठी देण्यात असल्याचे जाहीर केले आहे. तसे त्यांनी प्रशासनाला पत्र देखील दिले आहे. सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदा एका आमदाराने लोकांसाठी आपला रहाता बंगला खाली करून दिला आहे. आमदार भालके यांच्या सामाजिक दातृत्वाचे स्वागत केले जात आहे. 

पंढरपूर शहराची सुमारे सव्वा लाख लोक संख्या आहे. त्यातच शहरात कोरोना बाधित रूग्ण संख्या वाढू लागली आहे. पुणे, मुंबईसह इतर राज्यातून आतापर्यंत सुमारे सहा हजारांहून अधिक लोक शहर व तालुक्‍यात आले आहेत. नगरपालिका प्रशासनाने शहरातील मठ, धर्मशाळा आणि मठामध्ये बाहेरून आलेल्या लोकांना विलगीकरण केले आहे. कोरोनाचा वाढता धोका पाहाता, आमदार भारत भालके यांनी आज आपला राहाता बंगला लोकांसाठी खाली करून देणार असल्याचे जाहीर केले. या दुमजली बंगल्यामध्ये जवळपास 100 हून बेड बसतील. यासाठी लागणारे सर्व साहित्य देखील आपण उपलब्ध करून देणार आहे. या ठिकाणी अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांसाठी देखील सोय केली जाईल. यापूर्वीच आमदार भालके यांनी पंढरपूर शहर व तालुक्‍यातील आरोग्य केंद्रासाठी सुमारे 25 लाख रूपयांचा निधी दिला आहे. या निधीमधून त्यांनी मास्क, पीपीई कीट, सॅनिटायझरसह आवश्‍यक वैद्यकीय साधने खरेदीसाठी हा निधी खर्ची केला आहे. आणखी काही निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही आमदार भारत भालके यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com