esakal | आमदार प्रणिती शिंदे यांनी रुग्णांसाठी केली प्रार्थना ! 'बॉईज'ध्ये 50 बेडचे हॉस्पिटल सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

1Praniti_Shinde_Congress_Solapur (1).jpg

आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या...

 

हॉस्पिटल सुरु होतात, पण कोणालाही आजार होऊ नये आणि हॉस्पिटलमध्ये कोणाला येण्याची गरज पडू नये. जर कोणी रुग्ण म्हणून आले, तर लवकरात लवकर बरे होऊन घरी जावे, अशी प्रार्थना करते. तसेच डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी कोरोना काळात खूप मोठे काम केले असून त्यांच्यामुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मृत्यूचा दर कमी करण्यात डॉक्‍टरांचा मोटा वाटा राहिला आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांनी रुग्णांसाठी केली प्रार्थना ! 'बॉईज'ध्ये 50 बेडचे हॉस्पिटल सुरू 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा, को-मॉर्बिड तथा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या हेतूने शनिवारी (ता. 10) हिंगलाज माता बॉईज या नागरी आरोग्य केंद्रात  येथे 50 बेडचे हॉस्पिटल सुरु केले.

शहरात 15 नागरी आरोग्य केंद्रे असून त्यातील बॉईज हॉस्पिटल येथे 50 बेडचे नवे हॉस्पिटल सुरु करण्यात आले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, हॉस्पिटल सुरु होतात, पण कोणालाही आजार होऊ नये आणि हॉस्पिटलमध्ये कोणाला येण्याची गरज पडू नये. जर कोणी रुग्ण म्हणून आले, तर लवकरात लवकर बरे होऊन घरी जावे, अशी प्रार्थना करते. तसेच डॉक्‍टर, आरोग्य कर्मचारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. त्यांनी कोरोना काळात खूप मोठे काम केले असून त्यांच्यामुळेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मृत्यूचा दर कमी करण्यात डॉक्‍टरांचा मोटा वाटा राहिला आहे. या हॉस्पिटलच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त पी. शिवशंकर, गटनेते श्रीनिवास करली, गटनेता किसन जाधव, रियाज खरादी, कुमुद अंकाराम, उपायुक्त धनराज पांडे आदी उपस्थित होते. दरम्यान, नागरिकांनी लक्षणे दिसताच दवाखान्यात दाखल व्हावे, नियमांचे तंतोतंत पालन करुन स्वत:च्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापौर श्रीकांचना यन्नम यांनी यावेळी केले. तर 'कुटूंब माझी जबाबदारी'अंतर्गत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडता गर्दीच्या ठिकाणी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केले.

शहरातील कोरोनाची सद्यस्थिती... 

  • शहरातील 85 हजार 199 संशयितांची झाली कोरोना टेस्ट
  • आतापर्यंत 76 हजार 206 संशयितांची टेस्ट आली निगेटिव्ह
  • शहरात आतापर्यंत आढळले आठ हजार 993 कोरोनाचे रुग्ण
  • शहरातील मृतांची संख्या पाचशेच्या उंबरठ्यावर; आज 38 वर्षीय महिलेचा मृत्यू
  • आज 581 टेस्टमध्ये शहरात आढळले 52 पॉझिटिव्ह; उपमहापौरांचाच प्रभाग अव्वल