संजयमामा शिंदे देणार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक महिन्याचे वेतन 

प्रमोद बोडके
सोमवार, 23 मार्च 2020

महापूरच्या वेळेसही मदत 
करमाळ्याचे अपक्ष आमदार व सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजयमामा शिंदे यांनी पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला होता. कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्यांसाठी संजयमामा शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला भरीव मदत केली होती. अध्यक्ष पदाच्या कालावधीतील संपूर्ण मानधन रक्कम व त्यामध्ये तेवढीच स्वत:ची रक्कम आमदार शिंदे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली होती. 

सोलापूर : महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूंचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाला मदतीचा हात देण्यासाठी करमाळ्याचे अपक्ष आमदार संजयमामा शिंदे सरसावले आहेत. आमदारकीचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. 

aschim-maharashtra-news/solapur/inspection-2574-disciples-arriving-solapur-273129">हेही वाचा - सोलापुरात येणाऱ्या 2574 जणांची तपासणी 
आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. चीन, इटली यासह परदेशात असलेला कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागापर्यंत पोचण्याची भीती निर्माण झाली आहे. नागरिकांनी या संकटाला घाबरू नये. कोरोनाच्या संकटाचा सामना आपण करू शकतो. वारंवार हात धुणे, मास्क वापरणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळल्यास आपण कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार रोखू शकतो. मला काही होत नाही अशा भ्रमात न राहता प्रत्येकाने प्रशासनाच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहनही आमदार संजयमामा शिंदे यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mla sanjaymama Shinde will pay one month salary to the Chief Minister Fund