संचारबंदीचे उल्लंघन; भाजपचेआमदार सुजितसिंह ठाकुर यांच्यावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 7 April 2020

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य असलेले आमदार श्री. ठाकूर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. शिंदे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन चैत्री एकादशी दिवशी पूजा केली.

पंढरपूर (सोलापूर) : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करून श्री विठ्ठल रुक्मिणीची चैत्री एकादशीची पूजा केल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुजितसिंह ठाकुर आणि शिवसेनेचे पंढरपुर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह चौघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. असे असताना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य असलेले आमदार श्री. ठाकूर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. शिंदे यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात येऊन चैत्री एकादशी दिवशी पूजा केली. संचारबंदी असताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला या कारणावरून श्री. ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप मांडवे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केली होती. त्याची दखल घेऊन पोलिसांनी आमदार श्री. ठाकूर आणि श्री. शिंदे या दोघांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Sujitsingh Thakur FIR in Pandharpur police