कोणत्याही प्रकारची कावीळ असू द्या.... सोलापूर जिल्ह्यातील 'हे' गाव आहे कावीळ उपचारासाठी प्रसिद्ध

jaundice  images.jpg
jaundice images.jpg

नुसंत ‘कावीळ’चं नाव घेतलं तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो. शक्यतो पावसाळ्यात होणारा हा आजार आहे. अनेकजण यावर वेगवेळे उपचार घेतात... हजारो रुपये खर्च करतात... मात्र, त्यातून होणारा त्रास कमी होत नाही. त्रास कमी व्हावा म्हणून अनेकजण खर्चाचा विचार न करता कोठेही उपचार घेण्यास  तयार असतात. यातूनच सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब येथे उपचार घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण येतात. त्यामुळे ‘कावीळ’वर उपचार करणारे गाव म्हणून या गावाची ओळख निर्माण होऊ लागली आहे.

सोलापूर- पुणे महामार्गावरील वरवडे टोल नाक्याजवळ माढा तालुक्यातील मोडनिंब हे गाव आहे. येथे खास कावीळवर उपाचार घेण्यासाठी नेहमी रुग्ण येतात. येथील उपचार घेतल्याने फरक पडल्याचा दावा अनेक रुग्ण करत आहेत. मोडनिंबमध्ये कावीळवर उपचार मिळतो आणि काही दिवसात तो आजार बरा ही होतो, असे अनेकांचे बोल असल्याने महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेशमधून येथे रुग्ण येतात.

कावीळ झाल्यास त्वचा व डोळे पिवळे दिसू लागतात. रक्तातील बिलिरुबीनची (Bilirubin) पातळी वाढल्यामुळे हा पिवळसरपणा येतो. पावसाळ्यात पाणी गढूळ झाले की कावीळचे रुग्ण वाढू लागतात. दुषित पाण्यामुळे कावीळची साथ आढळून येते. कावीळ ही अनेक प्रकारची असते. कावीळ होण्याची कारणेही अनेक असतात. यावरूनच कावीळवरती उपचारपद्धती ठरवली जाते. कावीळ हे मुख्यत: दूषित अन्न आणि दूषित पाण्यामुळे होत. यामध्ये ९९ टक्के बालकांना कावीळ हा लगेच होते. १० ते १५ दिवसांमध्ये लगेच बराही होते. जंक फुड, फास्ट फुड खाणाऱ्यांमध्ये कावीळचे प्रमाण जास्त असते. यामध्ये ३५ वयामधील लोक जास्त प्रमाणात असतात. वयोवृद्धांमध्ये कावीळचे प्रमाण कमी असते. कारण त्यांना प्रत्येक गोष्टींचा अनुभव असतो आणि त्यांचा आहार हलका असतो. 

कावीळ झाली आहे किंवा कावीळचा संशय आला तरी लोक प्रथम धाव घेतात ती झाडपाल्याचं औषध देणाऱ्या माणसाकडे. मग तो पाल्याचा रस असो, खायच्या पानातून द्यायचे काही औषध असो, चुन्याच्या पाण्यात हात टाकून ते कावीळ उतरवून पिवळे करणे असो किंवा कुण्या हकिमाकडे जाऊन डोक्यावर काही झाडून घेऊन कावीळ उतरवणे असो. काहीही म्हणा पण आपल्या देशात कावीळवर अ‍ॅलोपथीमध्ये काहीही औषध नाही. हा समज वा गैरसमज बऱ्याच प्रमाणात रोवून बसलेला आहे. मोडनिंबमध्ये डॉ. प्रविण पाटील व डॉ. सोनल पाटील हे कावीळवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 

पत्रकार प्रकाश सुरवसे म्हणाले, मोडनिंबमध्ये कावीळवर उपचार घेण्यासाठी अनेकजण येतात. महाराष्ट्रासह अनेक भागातून रुग्ण येतात. जो कावीळवर उपचार करून करून थकून जातो तो मोडनिंबमध्ये उपचार घेऊन कावीळमुक्त झाल्याची उदाहरणे आहेत.

पूर्वी अशी बनवली जायची औषधे...  

मेडिकलमध्ये मिळत नसलेले महत्त्वाचे काही आयुर्वेदिक औषधे मोडनिंबमध्ये बनवली जात आहेत. ही औषधे वैद्य पाटील यांच्या घरात पूर्वी चुलीवर बनवली जायची. आता गॅसवर बनवली जातात. एकदम १०- १५  किलो औषध तयार करून ते एक ते दोन महिने वापरतात.

मोडनिंबमधील औषधांची वैशिष्ट्य...  

कावीळचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कोणत्या रुग्णाला कोणतं औषध गुणकारी आहे. त्याप्रमाणे रुग्णांना औषध दिले जाते. त्यांना कावीळचे कोणते लक्षण आहेत तसेच त्याचं नाडी परीक्षण करून औषधांचा नियोजन ठरवलं जातं.

कावीळ बरा होण्याचा कालावधी... 

कावीळ जंकफूड खाल्यामुळे जास्त होतो. तो दोन आठवडेपर्यत राहतो. आणि जास्त प्रमाणात मद्यप्राशन केल्यावर लिव्हर खराब होते. त्यामुळे कावीळ ही १८ महिन्यापर्यंत राहते. लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाची लक्षण जशी असतील त्या वरून कावीळ बरा होण्याचा कालावधी ठरलेला असतो. 

कावीळ म्हणजे...

कावीळ हा यकृताचा आजार असून रक्तातील बिलुरुबिनचे प्रमाण वाढल्यास त्याला जाऊंडीक (Jaundice) कामला, पिलीया, कावीळ असे म्हणतात.

कावीळ होण्याची कारणे...

१) दूषित अन्न, दूषित पाणी, बेकरी पदार्थ, शिळे अन्न, विषारी पदार्थ यांच्या सेवनाने अधिक मद्यपानाने कावीळ होऊ शकते. २) अधिकचे व्यसन केल्याने यकृताच्या पेशींना इजा होते तसेच यकृताला सूज येते, त्यामुळे कावीळ होते. ३) पित्ताशयात खडे होणे यासारख्या पित्ताशयाच्या विकारामुळे पित्ताशयाला सूज येऊन कावीळ होऊ शकते. ४) यकृत कॅन्सर, यकृत सिरोसिस यासारख्या यकृताच्या विकाराने कावीळ होते. ५) विल्सन डिसीजने कावीळ होते ६) रक्त कमी झाल्यानंतर तेलकट, तिखट, आंबट, विरुद्ध आहाराचे अतिसेवन केल्याने कावीळ होते.

कावीळचे लक्षणे...

१) त्वचा व डोळे पिवळे होणे २) मूत्राचा रंग अधिक पिवळा होणे. ३) पोटदुखी, विबंध आटोप
४) अतिथकवा किंवा अंग गळून पडणे ५) उलट्या, मळमळ अरुची किंवा जेवायची इच्छा न होणे.
६) अंगदाह होणे किंवा अंगाची खाज होणे, अंग मोडून जाणे. ७) वेदनारहित काविळीमध्ये त्वचा, नख, डोळे पिवळे होतात. व वजन कमी होते.
८) संताप, अस्वस्थता, क्रोध व बैचेनी वाढते. ९) ताप येणे. १०) त्वचेचा वर्ण बेडकासारखा होणे. 

कावीळची पथ्ये...

- सेंद्रिय काकवी ज्वारीच्या भाकरीसोबत दिवसातून एकवेळा खावी. दूध, भात, ज्वारीची भाकरी, मूगाची डाळ, पालकभजी, दुधी भोपळा, मटकीची भाजी, चिकू, केळी, सफरचंद, डाळिंब इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. उकळलेले पाणी प्यावे, पूर्ण विश्रांती घेणे, कडू औषधे कोरफड रसासोबत घ्यावीत.
-  रक्तवाढीसाठी बीट, खजूर, काळे मणुके, लाल फळे, लाल भाजल्या, सेंद्रिय गूळ खावे.
- दररोज १० काळ्या मनुका भिजवून खाणे व त्याचे पाणी लहान मुलांना द्यावे.

काय खावू नये...

- तेलकट, तिखट, आंबट, मासांहारी पदार्थ, व्यसनी पदार्थ, दारु, मैद्याचे पदार्थ, बेकरी उत्पादने, मॅगी, चॉकलेट, आईस्क्रीम, पिझ्झा, बर्गर, थंडपेय, इ. पदार्थांचे सेवन टाळावे. मेथी, शेपू, चुका, काजू, बदाम, खोबरे, नारळ पाणी व शेंगदाणे वर्ज करणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com