वाटचाल कोरोनामुक्तीकडे ! मोहोळ शहर-तालुक्‍यात एकही अहवाल आला नाही पॉझिटिव्ह 

गो. रा. कुंभार 
Saturday, 17 October 2020

मोहोळ शहर व तालुक्‍याच्या ग्रामीण भागात गुरुवारी (ता. 15) रात्री बारा वाजेपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या कोरोना संशयितांपैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर उपचार घेत असलेल्या एकूण रुणांपैकी एकही रुग्ण दगावला नाही, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली. त्यामुळे मोहोळ शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भाग आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. 

नरखेड (सोलापूर) : मोहोळ शहर व तालुक्‍याच्या ग्रामीण भागात गुरुवारी (ता. 15) रात्री बारा वाजेपर्यंत तपासणी करण्यात आलेल्या कोरोना संशयितांपैकी एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर उपचार घेत असलेल्या एकूण रुणांपैकी एकही रुग्ण दगावला नाही, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली. त्यामुळे मोहोळ शहर व तालुक्‍यातील ग्रामीण भाग आता कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसून येत आहे. 

सहा महिन्यांपासून कोरोना संसर्गाला सुरवात झाली. तेव्हापासून मोहोळ शहर व तालुक्‍याच्या ग्रामीण भागात कमी-जास्त प्रमाणात अखंडपणे कोरोना संसर्ग सुरू होता. परंतु गुरुवारी (ता. 15) रात्री 12 वाजेपर्यंत मोहोळ शहर व तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील तपासण्यांमध्ये एकूण संशयितांमधून एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. दुसरी आनंदाची बातमी म्हणजे उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी एकही रुग्ण दगावला नाही. त्यामुळे गुरुवारचा कोरोना चाचणी अहवाल मोहोळ शहर व तालुक्‍यासाठी कोरोनामुक्तीकडील पहिले पाऊल म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत मोहोळ शहर व तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील कोरोना सद्य:स्थितीची एकूणात आकडेवारी अशी : 1285 रुग्ण पॉझिटिव्ह, 68 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू. 252 रुग्ण उपचार घेत आहेत. तर उपचार घेत असलेले 965 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एकूण कोरोना चाचणी अहवालात मोहोळ, अक्कलकोट व उत्तर सोलापूर तालुक्‍याच्या ग्रामीण भागात नव्याने कोरोना संसर्गाचा एकही रुग्ण आढळला नाही. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mohol city and taluka started marching towards corona free