अर्ध्यावरती खेळ मोडला...! भीषण अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू तर पती गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा
Monday, 22 February 2021

हा अपघात सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहराजवळील कोळेगाव फाट्याजवळ सकाळी 11 वाजता झाला.

मोहोळ (सोलापूर) : भरधाव कारने लुना मोटार सायकलला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला.

हा अपघात सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळ शहराजवळील कोळेगाव फाट्याजवळ सकाळी 11 वाजता झाला. राधा जनार्धन मोटे (वय 39) असे मृत महिलेचे नाव आहे तर जनार्धन हरिदास मोटे (वय 47) असे जखमीचे नाव असून दोघेही नरखेड (ता.मोहोळ) येथील रहिवाशी आहेत. जखमीला तातडीने राष्ट्रीय महामार्गाच्या पथकाने व टोळ नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी उपचारासाठी सोलापूरला दाखल केले आहे.

मसाज पार्लरमध्येच सुरु होता वेश्‍या व्यवसाय ! मिझोराम, नागालॅण्डच्या तीन मुलींसह दहाजण ताब्यात

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, जनार्धन हरिदास मोटे व राधा जनार्धन मोटे हे दोघे लुना मोटार सायकल क्रमांक एम एच 13/ डी एल  4498 वरून मोहोळकडून सोलापूरच्या दिशेने निघाले होते, तर त्याचवेळी कार क्रमांक एम एच 12 /एन बी  3196  ही पाठीमागून त्याच दिशेने जात होती.

दोन्ही वाहने कोळेगाव फाट्याजवळ येताच कारने लुना मोटार सायकलला पाठीमागून जोराची धडक दिली, त्यात राधा जनार्दन मोटे यांचा मृत्यू झाला, तर जनार्धन मोटे हे जखमी झाले तातडीने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे, या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Mohol a speeding car hit a Luna motorcycle from behind causing an accident