मसाज पार्लरमध्येच सुरु होता वेश्‍या व्यवसाय ! मिझोराम, नागालॅण्डच्या तीन मुलींसह दहाजण ताब्यात

तात्या लांडगे 
Monday, 22 February 2021

पोलिसांना वेश्‍या व्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एक बनावट ग्राहक त्याठिकाणी पाठविला. वेश्‍या व्यवसायाची खात्री पटल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक त्याठिकाणी दाखल झाले.

सोलापूर : भागवत चित्र मंदिर परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका व्यक्‍तीने गॅलेक्‍सी स्पा ऍण्ड मसाज पार्लर सुरु केले होते. मात्र, त्याठिकाणी मसाज अथवा स्पाचे काम सोडून वेश्‍या व्यवसायही सुरु झाला होता. या इमारतीपासून हाकेच्या अंतरावरच एक पोलिस चौकी असतानाही हा सगळा प्रकार गुपचूप सुरु होता. रविवारी (ता. 21) शहर स्थानिक गुन्हे शाखेला त्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पोलिसांना मिझोराम, नागालॅण्ड येथील मुली आढळल्या. पोलिसांनी तीन मुलींसह दहाजणांना ताब्यात घेतले आहे. 

पारव्यांना संसर्ग; 'एव्हिन पॉक्‍स'ची बाधा, जखमी आवस्थेत आढळण्याच्या प्रमाणात वाढ 

पोलिसांना वेश्‍या व्यवसायाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी एक बनावट ग्राहक त्याठिकाणी पाठविला. वेश्‍या व्यवसायाची खात्री पटल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक अजित कुंभार यांनी त्याठिकाणी धाव घेतली. पोलिसांनी त्याठिकाणीच्या महिलांना व पुरुषांना ताब्यात घेतले असून आता त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. फरार असलेल्या मालकाचा शोध सुरु असल्याची माहिती श्री. साळुंखे यांनी दिली.

ठळक बाबी... 

- भागवत चित्रमंदिर परिसरातील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर महिन्यापूर्वी सुरु केला मसाज पार्लर 
- गॅलेक्‍सी स्पा ऍण्ड मसाज पार्लरच्या नावाखाली मालकाने सुरु केला वेश्‍या व्यवसाय 
- मिझोराम, नागालॅण्ड येथील मुलींसह दहाजणांना पोलिसांनी घेतले ताब्यात 
- मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्‍या व्यवसाय सुरु असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली 
- वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या पथकाने रविवारी (ता. 21) रात्री टाकला छापा 
- मालक फरार असून त्याचा शोध सुरु आहे; ताब्यातील संशयितांना आज न्यायालयात केले जाणार हजर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The prostitution business was started in a massage parlor in the city of Solapur