शहरातील नऊ हजारांहून अधिक रुग्ण बरे ! आज 32 पॉझिटिव्ह; एकूण ऍक्‍टिव्ह रुग्ण 509 

तात्या लांडगे
Friday, 20 November 2020

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 12 हजार 224 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत आढळले दहा हजार 75 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी नऊ हजार नऊ रुग्णांची कोरोनावर मात 
  • सद्यस्थितीत उरले 509 रुग्ण; आज शहरात आढळले 32 नवे रुग्ण 
  • आतापर्यंत शहरातील 557 रुग्णांचा मृत्यू; आज 865 संशयितांची टेस्ट 

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या कमी- अधिक होऊ लागली असून आज 865 संशयितांमध्ये 32 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्ण कोरोनाचा बळी ठरलेला नाही. आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी नऊ हजार नऊ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या शहरातील 509 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

ठळक बाबी... 

  • आतापर्यंत शहरातील एक लाख 12 हजार 224 संशयितांची कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत आढळले दहा हजार 75 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी नऊ हजार नऊ रुग्णांची कोरोनावर मात 
  • सद्यस्थितीत उरले 509 रुग्ण; आज शहरात आढळले 32 नवे रुग्ण 
  • आतापर्यंत शहरातील 557 रुग्णांचा मृत्यू; आज 865 संशयितांची टेस्ट 

 

शहरात आज सलगर वस्ती (डोणगाव रोड), शिक्षक सोसायटी, एसआरपी कॅम्प, मोदीखाना, नटराज नगर, डांगे रेसिडेन्सी (शेळगी), सोहम प्लाझा (सैफूल), संतोष नगर, भारती विद्यापीठजवळ, लक्ष्मी बॅंक कॉलनी, दोंदे नगर, मनमीत ब्लॉसम (जुळे सोलापूर), आर्शिवाद नगर (मजरेवाडी), मंत्री चंडक कॉम्प्लेक्‍स (बुधवार पेठ), सिध्दजीन सोसायटी (मुरारजी पेठ), कविता नगर (अक्‍कलकोट रोड), शिवाजी नगर (बाळे), विणकर बागेजवळ (रविवार पेठ), जगदंबा चौक, न्यू आदित्य नगर, राजस्व नगर, कुर्बान हुसेन नगर, शिवशरण नगर (एमआयडीसी), आदित्य नगर, मंत्री चंडक (विजयपूर रोड), शुक्रवार पेठ, हनुमान मंदिराजवळ (बुधवार पेठ) आणि दक्षिण सदर बझार येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. रुग्णांच्या संपर्कातील 104 संशयित होम क्‍वारंटाईन असून 42 जण इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये आहेत. दुसरीकडे 30 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than 9,000 patients in the solapur city healed! 32 positive today; Total active patients 509