esakal | कोरोना संशयीताचा रेल्वे प्रवास ! उद्यान एक्‍स्प्रेसचा डबा सील 
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai benglor uddyan express

ठळक बाबी... 

  • कतारहून विमानाने मुंबईत आला होता प्रवासी 
  • उद्यान एक्‍स्प्रेसने कलबुर्गीकडे जाताना दौण्ड स्थानकावर घेतले ताब्यात 
  • सर्दी, खोकला असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण 
  • त्या कोचमधील 50 प्रवासी हलविले दुसऱ्या डब्यात 
  • तो डबा केला सील : प्रवाशांची माहिती रेल्वे प्रशासनाने घेतली 

कोरोना संशयीताचा रेल्वे प्रवास ! उद्यान एक्‍स्प्रेसचा डबा सील 

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कतारहून विमानाने मुंबई विमानतळावर उतरलेल्या प्रवाशाला होम कोरोन्टाईनचा शिक्‍का मारण्यात आला होता. मात्र, तो शनिवारी (ता. 21) उद्यान एक्‍स्प्रेसने मुंबईहून कलबुर्गीकडे निघाला होता. रेल्वेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना त्याला सर्दी, खोकला असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याला दौण्ड रेल्वे स्थानकावर तपासले असता, त्याच्या हातावरील शिक्‍का दिसला आणि तत्काळ त्याला दौण्ड आरोग्य विभागाच्या हाती सोपविण्यात आले. 


हेही नक्‍की वाचा : खासदार डॉ. महास्वामींना पोलिसांकडून केव्हाही होऊ शकते अटक 


कोरोनाच्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकार विविध पातळ्यांवर उपाय करीत आहे. मात्र, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस घरातच थांबावे, असे आवाहन केले जात आहे. तर त्यांच्या हातावर होम कोरोन्टाईलचा शिक्‍काही मारण्यात येत आहे. परंतु, कतारहून आलेला हा प्रवाशी बिनधास्तपणे रेल्वे कलबुर्गीला जाताना दिसून आला. त्या डब्यातील रेल्वे प्रवाशांना त्याची कूणकूण लागली आणि त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना कळविले. त्यानंतर तत्काळ रेल्वे अधिकारी व रेल्वे पोलिस फोर्सचे कर्मचारी दौण्ड रेल्वे स्थानकावर पोहचले. त्यांनी त्या प्रवाशाला ताब्यात घेतले, त्यावेळी त्याला सर्दी, खोकला असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या रक्‍ताचे नमुने आता पडताळणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, रेल्वे अधिकाऱ्यांनी उद्यान एक्‍स्प्रेसचा तो डबा जंतूनाशकांनी स्वच्छ करीत त्यातील प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हलविले आहे. तो डबा सिल करण्यात आला असून त्या डब्यातील सर्व प्रवाशांची माहिती संकलित करुन संबंधित ठिकाणच्या आरोग्य विभागाला सोपविण्याची तयारी रेल्वे प्रशासनाने केली आहे. या कारवाईत रेल्वे प्रशासनाने दाखविलेल्या सतर्कतेचे प्रवाशांनी कौतूक केले. 

हेही नक्‍की वाचा : कोरोनाची अफवा पडली महागात ! अमरसिंग राठोड जेरबंद 


डबा सिल करुन प्रवाशांना दुसऱ्या डब्यात हलविले 
उद्यान एक्‍स्प्रेसमधून मुंबईहून कलबुर्गीला निघालेला प्रवाशी कतारहून विमानाने मुंबईत आला होता. त्याच्या हातावर होम कोरोन्टाईलचा स्टॅम मारण्यात आला होता. मात्र, तरीही तो रेल्वे प्रवास करीत असल्याची माहिती मिळताच, त्याला दौण्ड रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. त्याला सर्दी, खोकला असल्याने तो डबा जंतूनाशकाने स्वच्छ करुन घेतला आहे. त्या डब्यातील प्रवासी दुसऱ्या डब्यात हलविले असून त्यांची माहिती संकलित केली असून त्यांना 14 दिवस घरातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 
- प्रदिप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर रेल्वे 

go to top