
मंगळवेढा(सोलापूर) : तालुक्यातील गुंजेगाव ते महमदाबाद शे. या दोन गावांला जोडणारा पर्यायी लोखंडी पूल धोकादायक झाला आहे. या ठिकाणी नवीन सिमेंट पुलाची मागणी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली.
तालुक्याच्या पश्चिम भागातील या बागायत क्षेत्रांत शेतमालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या उजनी उजव्या कालव्यावरील गुंजेगाव महमदाबाद या दोन गावांना जोडणारा लोखंडी पूल काही गंजला आहे. हा पुल कमी रुंदीचा असल्याने शेतीमालाची वाहतूक करणे, दुध संकलन करणे, शाळेसाठी विद्यार्थाची ये जा करणे अडचणीचे होत आहे. धोकादायक पुलामुळे काही वेळा किरकोळ अपघात देखील झाले आहेत. पुलाचे नूतनीकरण करणे व बंधाऱ्यातील गळतीची दुरुस्ती करण्याच्या कामाकडे संबंधित खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने उपोषण करण्यात आले.
भीमा पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री.चव्हाण, श्री. सुरडकर व शाखा अभियंता श्री. कोळवले यांनी बळीराजा शेतकरी संघटनेच्या उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. त्यानंतर महाराष्ट् कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे यांच्या कार्यालयाकडून सदरचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला. प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष माऊली हळणवर, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जवळेकर,बिराप्पा मोठे , तालुकाध्यक्ष दामाजी मोरे, बापूसाहेब मेटकरी धनाजी गडदे अंकुश गरंडे, तानाजी सोनवणे दत्तात्रय वरपे नितीन काळे यांच्यासह बळीराजा शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व या परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
संपादनः प्रकाश सनपूरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.