व्हॉटसऍपवर चुकीची पोस्ट केली तर डायरेक्ट तुरुंगात!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

व्हॉटसऍप हे मेसेजिंग ऍप सर्वांपर्यंत पोचलेले सर्वाधिक लोकप्रिय आहे. सर्वसामन्यांपासून ते बड्यांपर्यंत, सर्वच क्षेत्रात याचा वापर होत आहे. या ऍपवरून अल्पावधीत गोष्टी शेअर केल्या जातात. मात्र, व्हॉटसऍप सारख्या समाज माध्यमांवरून अनेकदा अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे जाळपोळीच्या घटना घडतात.

सोलापूर : सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या व्हॉटसऍपने युजर्सना फेसबुकप्रमाणे फ्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत. त्यात चुकीची पोस्ट केली तर तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. 

व्हॉटसऍप हे मेसेजिंग ऍप सर्वांपर्यंत पोचलेले सर्वाधिक लोकप्रिय आहे. सर्वसामन्यांपासून ते बड्यांपर्यंत, सर्वच क्षेत्रात याचा वापर होत आहे. या ऍपवरून अल्पावधीत गोष्टी शेअर केल्या जातात. मात्र, व्हॉटसऍप सारख्या समाज माध्यमांवरून अनेकदा अफवा पसरवल्या जातात. त्यामुळे जाळपोळीच्या घटना घडतात. याला आळा घालण्यासाठी सरकारने कठोर पावलं उचलली आहेत. त्यामुळे समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. याआधी फेसबुकने त्यांच्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यानंतर व्हॉटसऍपनेही युजर्ससाठी नियम सांगितले आहेत. 

त्यामुळे व्हॉटसऍपवरील ग्रुप ऍडमीन पोलिसांच्या रडारवर असणार आहेत. एखाद्या ग्रुप मेंबरने बेकायदेशीर कृत्य केले तर ऍडमीनला जबाबदार धरलं जाईल. ग्रुपमध्ये पॉर्न व्हिडिओ, यातही लहान मुलांचे व्हिडिओ, फोटो किंवा आक्षेपार्ह मजकूर शेअर होत असेल तर ऍडमिनला अटक होऊ शकते. एडिटेड, मॉर्फ केलेले व्हिडिओ शेअर करण्यासही बंदी आहे. पोस्टमुळे एखाद्याची बदनामी होत असेल तर याचे गंभीर परिणाम ऍडमिनला भोगावे लागतील. व्हॉटसऍप ग्रुपमध्ये एखाद्या महिलेबाबत काही आक्षेपार्ह पोस्ट केलं किंवा त्याबद्दल महिलेने तक्रार दाखल केली तर ऍडमिनवर कारवाई होणार आहे.

भडकावू मेसेज, एखाद्या धर्माविरोधात काही शेअर करणंही ग्रुप ऍडमिनला अडचणीत आणू शकतं. संवेदनशील मुद्द्यांवर खोट्या बातम्या, अफवा, मल्टिमिडिया फाइल्स शेअर करणं ग्रुप ऍडमिनसह मेम्बरसाठीही धोक्‍याचं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तस्करीसाठी व्हॉटसऍपचा वापर केला जातो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New policies introduces for whatsapp users