प्रेम प्रकरणातून मारहाण : आमदार पडळकरांनी घेतली जखमीची भेट

Padalkar
Padalkar

मंगळवेढा (सोलापूर) : प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलास मारहाण करण्याचा प्रकार अमानुष असून, पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. 

प्रेमविवाह केल्याच्या रागातून झालेल्या मारहाणीत जखमी मुलाचे वडील दामाजी बरकडे यांची भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट घेऊन विचारपूस केली व धीर दिला. मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरत नातेवाइकांना फोन का केला, असे विचारत मुलीच्या नातेवाइकांनी मुलाच्या वडिलास घरापासून मारहाण करत भर चौकात झाडाला बांधून मारहाण केली. दरम्यान, मुलगा व पत्नीसही शिवीगाळ करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पुजारी व हरिदास सलगर हे पथकासह तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने पुढील अनर्थ टळला होता. या प्रकरणात एकूण बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी काल रात्रीपर्यंत नऊ आरोपींना ताब्यात घेतले आहे. दोन महिला व एक अल्पवयीन मुलाचाही यात समावेश आहे. 

पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्तात्रय पाटील, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनीही घटनास्थळी भेट दिली. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जखमीच्या घरी जाऊन भेट घेतली व विचारपूस केली. मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करत भयभीत झालेल्या बरकडे कुटुंबाला आधार देत, धनगर बांधव आपल्या पाठीशी आहेत, असे आश्‍वासन दिले. या वेळी पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची व तपासकामाची माहिती दिली. त्या वेळी पडळकर यांनी पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले. 

या वेळी माऊली हळणकर, तानाजी खरात, धनाजी गडदे, बापू मेटकरी, रविकिरण कोळेकर, अमोल माने, श्री. मस्के, विठ्ठल सरगर, भारत सलगर, महादेव इरकर, पोपट सोलनकर, दत्तात्रय सोलनकर आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com