
दक्षिण सोलापूर (सोलापूर) : हिंदू जनजागृती समितीतर्फे आयोजित नववे अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशन गुरुवार (ता.30) पासून ऑनलाइन पद्धतीने सुरू होत आहे. हे अधिवेशन 30 जुलै ते 2 ऑगस्ट तसेच 6 ते 9 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. देश-विदेशांतून विविध संघटनांचे विचारवंत, संपादक, उद्योगपती ऑनलाइन मार्गदर्शन करणार असल्याची माहिती जिल्हा समन्वयक राजन बणगे यांनी दिली.
कोरोनाच्या संकटामुळे हे अधिवेशन ऑनलाइन होत आहे. दरवर्षी 25 राज्यांतील एकूण 174 हिंदू संघटनांचे 520 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत. यंदा देश-विदेशांतून विविध हिंदुत्वनिष्ठ नेते, कार्यकर्ते, अधिवक्ते, विचारवंत, संपादक, उद्योगपती ऑनलाइन मार्गदर्शन करतील. यामध्ये अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, राष्ट्रीय वारकरी पाईक संघटनेचे प्रवक्ता रामकृष्ण वीर महाराज, हिंदू महासभेचे अध्यक्ष बाळकृष्ण डिंगरे, पेशवा युवा मंचचे सचिव गणेश लंके, ऍड. लक्ष्मण मारडकर, ऍड. मुकुंद कुलकर्णी, माजी नगरसेवक बापूसाहेब ढगे, अभियंता संतोष भोसले, लेखापाल श्रीनिवास वैद्य, ऍड. रमाकांत बापट, शिवराज पडशेट्टी, उद्योजक विनय संघवी, आनंद सोमाणी ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत.
हिंदू संघटना आणि संप्रदाय यांनी राष्ट्रहित अन् धर्महित यांसाठी योगदान देणे, भारत हे हिंदू राष्ट्र घोषित करणे या सूत्रांच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करणे, समान कृती कार्यक्रम ठरवणे आणि हिंदू हिताचे ठराव संमत करणे हे अधिवेशनाचे स्वरूप असल्याचे श्री. बणगे यांनी सांगितले.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.