"या' जिल्ह्यात वाढली "अँटिजेन'मुळे रुग्णसंख्या ! मात्र मृत्यूदर आला दहावरून 5.5 टक्‍क्‍यांवर 

तात्या लांडगे 
Tuesday, 28 July 2020

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, लॉकडाउनच्या कालावधीत टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले. 1 ते 27 जुलै या कालावधीत सुमारे 33 हजार 870 चाचण्या केल्या. या चाचण्यांतून पाच हजार 701 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या. लॉकडाउन कालावधीत 12 हजार 146 रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या. या वाढलेल्या टेस्टमुळे उपचारासाठी आवश्‍यक असणारी आरोग्य व्यवस्थाही विकसित केली. सध्या जिल्ह्यात कोव्हिड केअर सेंटरमध्ये चार हजार 664, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये तीन हजार 499 आणि डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तीन हजार 499 बेडची क्षमता विकसित करण्यात आली आहे. 

सोलापूर : लॉकडाउनच्या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील मृत्यूदर घटविण्यात यश आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. सोलापूरचा मृत्यूदर काही दिवसांपूर्वी सुमारे 10 टक्के होता. वाढविलेल्या रॅपिड अँटिजेन चाचण्या आणि त्वरित करण्यात आलेल्या उपचारांमुळे तो आता 5.5 टक्‍क्‍यांवर आला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

हेही वाचा : लॉकडाउन संपल्यानंतर व्यापारी व नागरिकांच्या बेशिस्तीने शहर पुन्हा गर्दीत अडकले! वाचा सविस्तर 

कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी 17 ते 26 जुलै या कालावधीत लॉकडाउन जाहीर केला होता. या लॉकडाउनच्या कालावधीत जिल्हा प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या, याबाबत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते. 

हेही वाचा : "अहो, ते आमच्या गावचे नाहीत, त्या गावचे हाईत..!' कोरोनावरून गावकऱ्यांत रंगतोय संवाद; प्रशासनाच्या अहवालामुळे संभ्रम 

जिल्हाधिकारी शंभरकर म्हणाले, लॉकडाउनच्या कालावधीत टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात आले. 1 ते 27 जुलै या कालावधीत सुमारे 33 हजार 870 चाचण्या केल्या. या चाचण्यांतून पाच हजार 701 पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या. लॉकडाउन कालावधीत 12 हजार 146 रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या. या वाढलेल्या टेस्टमुळे उपचारासाठी आवश्‍यक असणारी आरोग्य व्यवस्थाही विकसित केली. सध्या जिल्ह्यात कोव्हिड केअर सेंटरमध्ये चार हजार 664, डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्ये तीन हजार 499 आणि डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये तीन हजार 499 बेडची क्षमता विकसित करण्यात आली आहे. 

गंभीर रुग्णांवर नामवंत डॉक्‍टरांकडून उपचार करता यावे यासाठी टेलि-आयसीयू प्रणाली लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मुंबई, पुणे येथील डॉक्‍टरांचा सल्ला घेता येणार आहे. यासाठी आवश्‍यक असणाऱ्या हायस्पीड डाटा लाइनची व्यवस्था करण्यात आल्याचेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

सार्वजनिक आरोग्य विभाग आणि विविध ठिकाणी उभारण्यात येणारी कोव्हिड केअर सेंटर, हॉस्पिटलसाठी पदभरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण तीन हजार 824 पदांची भरती केली जाणार आहे. केटरिंग कॉलेजमध्ये असलेल्या कोव्हिड केअर सेंटरमध्ये योगासने, प्राणायाम, संगीत यांचाही उपचारासोबत वापर केला. तिथे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. समुपदेशक नेमण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने लॉकडाउनच्या कालावधीत सामाजिक संस्थांच्या मदतीने गरजूंना सुमारे 36 हजार फूड पाकिटांचे वितरण केल्याचेही श्री. शंभरकर यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapid antigen test increased the number of patients in Solapur district; The death rate is 5.5 percent