"निजामुद्दिन' मेळावा : सोलापुरातील 25 जणांचे घेतले नमुने 

प्रमोद बोडके
बुधवार, 1 एप्रिल 2020

  • सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंतची कारवाई 
  •  आजपर्यंत दाखल झालेले गुन्हे : 1399 
  •  आजपर्यंत अटक झालेल्या व्यक्ती : 188 
  •  आजपर्यंत जप्त केलेली वाहने : 1174 

सोलापूर : दिल्ली येथील हजरत निजामुद्दिन भागात तबलिके जमात या धार्मिक संस्थेने आयोजित केलेल्या मेळाव्यात सोलापूर जिल्ह्यातून 25 जण सहभागी झाल्याची धक्कादायक माहिती आज समोर आली आहे. या मेळाव्यात सहभागी झालेल्या 17 व्यक्तींची यादी विभागीय आयुक्तांकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली होती. या 17 मधील सहा व्यक्ती पर राज्यातील/पर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. या मेळाव्यात जिल्ह्यातून सहभागी झालेल्या 14 जणांचा पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक कार्यालयाने घेतल्याने जिल्ह्यातील सहभागी व्यक्तींची संख्या 25 वर गेली आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/corona-one-crore-rupees-precision-help-275991">हेही वाचा - कोरोना : प्रिसिजनची एक कोटींची मदत 
मेळाव्यात सहभागी झालेल्या व्यक्तींची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन व पोलिसांच्यावतीने मंगळवारी रात्रीपासूनच तातडीने सूत्र हलविण्यात आली आहे. या सर्व सहभागी व्यक्तींना सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. या 25 व्यक्तींच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून हे नमुने प्रयोगशाळेला पाठविण्यात आले आहेत. या तपासणीचा अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाला नव्हता. या अहवालात नेमके काय येते? याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 
हेही वाचा - "शिवभोजन' सोलापूर जिल्ह्यात 11 ठिकाणी सुरू 
निजामुद्दिन येथील मेळाव्यात सहभागी झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील 17 जणांची यादी विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने देण्यात आल्यानंतर नूसार त्या व्यक्तींचा शोध घेण्यात आला. 17 जणांपैकी फक्त 11 व्यक्तीच सोलापूर शहर व जिल्ह्यात असल्याचे समोर आले आहे. उर्वरित सहा व्यक्तींपैकी ठाणे व दिल्ली या ठिकाणी प्रत्येकी दोन व्यक्ती असल्याचे समोर आले. एक व्यक्ती टिपनगड तर एक व्यक्ती पुण्यात असल्याचे या पाहणीत समोर आले आहे. 
विलगीकरण कक्षात 31 जण 
सोलापूर जिल्ह्यातील 110 जण अद्यापही होम क्वारंटाईनमध्ये असून इन्स्टट्युन्शल क्वारंटाईनमध्ये 95 जण आहेत. आयसोलेशन वॉर्डात (विलगीकरण कक्षात) दाखल झालेल्यांची संख्या 31 एवढी असून निजामुद्दिन येथील मेळाव्याला गेलेल्या 25 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. या 31 जणांच्या थुंकीचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nizamuddin program samples taken from 25 people in Solapur