राज्यातील शिक्षकांच्या उन्हाळी सुटीला यंदा `खो` ... हे आहे कारण

राज्यातील शिक्षकांच्या  उन्हाळी सुटीला यंदा `खो` ... हे आहे कारण
Updated on

सोलापूर :  राज्यातील महापालिका व खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांना यंदा उन्हाळी सुटीला मुकावे लागण्याची शक्यता आहे. या सुटीच्या कालावधीतच एक राष्ट्रीय कार्यक्रम राबविला जाणार असल्याने कोणत्याही शिक्षकांना मुख्यालय सोडून जाता येणार नाही.

सुरुवात 1 मे पासून
महाराष्ट्रात 2021 च्या जणगणनेची सुरवात 1 मे पासून होणार आहे. ती 15 जूनपर्यंत सुरु राहिल. या कालावधीत शाळांना उन्हाळ्याची सुटी असते. मात्र यंदा ही सुटी रद्द होणार आहे. याच कालावधीत जनगणनेचे काम होणार असल्याने या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कोणत्याही शिक्षकाला सुटीवर जाता येणार नाही. 

दोन टप्प्यात होणार काम
जणगणनेचे काम दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात घरांना क्रमांक देणे व गटाची विभागणी करणे व घरयादी करणे या कामांचा समावेश आहे. हे काम 15 जूनपर्यंत होणे अपेक्षित आहे. हा कालावधी शिक्षकांच्या सुटीचा कालावधी असून, बहुतांश शिक्षक हे या सुटीत परगावी किंवा परदेश दौऱ्यावर जातात. मात्र यंदा सुटीला तसेच परदेश किंवा गावाच्या दौऱ्याला मुकावे लागणार आहे. 

... तर मुख्याध्यापकांवर कारवाई
जणगणनेच्या कामाला मोठ्या प्रमाणात शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे या कालावधीत महापालिका शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत असलेल्या महापालिका व खासगी प्राथमिक, अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना मुख्यालय सोडून जाता येणार नाही. कोणत्याही शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये असे आदेश मुख्याध्यापकांनी द्यावेत. एखादा शिक्षक सुटीवर गेल्याचे आढळल्यास त्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाणार असून, जणगणना कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे, असे पत्रक पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तांनी काढले आहे. त्याच धर्तीवर राज्यात अंमलबजावणी होणार आहे. 

जणगणना करण्यामागची उद्दीष्टे 
- भारत एक कल्याणकारी राष्ट्र आहे. स्वातंत्र्य प्राप्ती नंतर सामान्य माणसाच्या हितासाठी पंचवार्षिक योजना,वार्षिक योजना आणि वेगवेगळ्या कल्याणकारी योजना सुरु करण्यात आलेल्या आहेत.या सर्वांसाठी तळागाळापर्यंतची माहिती असणे जरुरीचे आहे आणि ही माहिती जनगणने व्दारेच उपलब्ध होते.

- संसद /विधानसभा ,पंचायत ,नगरपालिका,महानगरपालिका व इतर स्थानिक क्षेत्रातील मतदार संघाची संख्या निश्चित करणे ,मतदार संघाचे सीमांकन करणे साठी जनगणनेत संकलित केलेल्या माहितीचा उपयोग केला जातो.

- घरयादी व घरांची गणना अत्यंत उपयोगी आहे यामुळे मानवी निवासाच्या परिस्थितीचा बहुव्यापक आकडा मिळतो,निवासी घरांची कमतरता त्यामुळे घरकुल योजनेची आकडेवारी ठरविता येते.कुटुंबासाठी उपलब्ध असलेल्या सोयी व मालमत्तेसंबंधी आकडेवारी मिळते.याचा उपयोग स्थानिक व राज्य स्तरांवर योजना बनविण्यासाठी उपयोगी पडते.

- जनगणनेच्या आकडेवारीचा उपयोग अभ्यासक,व्यापारी उद्योगपती,योजनाकार,आणि निवडणूक अधिकारी इत्यादींच्या आवश्यकतासुद्धा पूर्ण करते.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mohol Police conduct a route march across the city and Shetphal ahead of Ganeshotsav to maintain law and order.
Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
Marathi News Esakal
www.esakal.com