उत्तर सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ निवड

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

काशीद हे १७ वर्षांपासून साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. गेल्यावर्षी त्यांच्याकडे पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तीन वर्षापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत त्यांनी स्व: खर्चाने मार्डी, नरोटेवाडी, सेवालालनगर, राळेरास या गावांमध्ये बंधाऱ्यांचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम करुन जलसंधारण चळवळीत योगदान दिले.

वडाळा (सोलापूर) : उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी मार्डी येथील उद्योजक प्रल्हाद विठ्ठल काशीद यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे व जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी वडाळा येथे काशीद यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे मानाजी माने उपस्थित होते. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काशीद हे १७ वर्षांपासून साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. गेल्यावर्षी त्यांच्याकडे पक्षाच्या तालुका कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तीन वर्षापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यात उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीत त्यांनी स्व: खर्चाने मार्डी, नरोटेवाडी, सेवालालनगर, राळेरास या गावांमध्ये बंधाऱ्यांचे खोलीकरण व गाळ काढण्याचे काम करुन जलसंधारण चळवळीत योगदान दिले. त्यांचा वृक्षसंवर्धनावर भर असून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करुन त्याचे संवर्धन करण्याचे कामही ते करतात. तर दरवर्षी उन्हाळ्यात नान्नज-मार्डी अभयारण्यातील वन्यजीवांच्या पाण्याची व्यवस्थाही ते स्वःखर्चाने करतात. शिवाय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने केलेल्या वृक्षारोपण उपक्रमात वर्षभर मार्डी-सोलापूर रस्त्यावरील झाडांना पाणी घालण्यासाठी ते स्वतःचा टँकर उपलब्ध करुन देतात. 
सामाजिक कार्याची आवड असलेले नेतृत्व उत्तर सोलापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसला लाभल्यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सामाजिक कार्याचा व विकासाभिमुख नेतृत्वाचा वसा आपण काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने जपणार असल्याचे काशीद यांनी निवडीनंतर पत्रकारांना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: North Solapur NCP taluka president elected as Pralhad Kashid