पेन्शन योजनेच्या स्पर्धेत आता पोस्टाची देखील नाविन्यपूर्ण योजना 

प्रकाश सनपूरकर
Wednesday, 14 October 2020

पोस्ट पेमेंटस बॅंकेने या बाबत अगदी आगळी वेगळी योजना आणली आहे. आतापर्यंत पोस्टाच्या योजना या विमा व बचतीच्या सदंर्भात होत्या. मात्र आता पेन्शन योजनेच्या माध्यमातून नवे ग्राहक जोडून त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. वयोगट 18 ते 60 वर्ष असलेल्या नागरिकांना योजनेत सहभाग नोंदवता येतो. तसेच या योजनेला कर सवलत एैशी सी देखील लागू करण्यात आली आहे. 

सोलापूरः अनेक विमा कंपन्यासह वित्तीय संस्थांनी पेन्शन योजना आणल्यानंतर आता पोस्टाच्या पोस्ट पेमेंटस बॅंकेने देखील नॅशनल पेन्शन स्किम बाजारात उतरवली आहे. म्युचअल फंड बेस असलेल्या या योजनेतून बचत व पेन्शनचे असे दुहेरी लाभ देण्यासारख्या सेवांचा यामध्ये समावेश आहे. 

हेही वाचाः शहरात दुकाने नऊपर्यंत दुकाने सुरू राहणार, सिनेमागृहांना टाळेच 

पोस्ट पेमेंटस बॅंकेने या बाबत अगदी आगळी वेगळी योजना आणली आहे. आतापर्यंत पोस्टाच्या योजना या विमा व बचतीच्या सदंर्भात होत्या. मात्र आता पेन्शन योजनेच्या माध्यमातून नवे ग्राहक जोडून त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. वयोगट 18 ते 60 वर्ष असलेल्या नागरिकांना योजनेत सहभाग नोंदवता येतो. तसेच या योजनेला कर सवलत एैशी सी देखील लागू करण्यात आली आहे. 

हेही वाचाः धावती रेल्वे व मुसळधार पावसात एका मातेसाठी तो बनला देवदूत 

यामध्ये दोन प्रकार निश्‍चित करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात थेट रक्कम जमा केल्यानंतर काढता येत नाही. तर दुसऱ्या प्रकारात ग्राहकाला त्याची रक्कम मुदतीपुर्वी काढता येते. वर्षाला किमान सहा हजार रुपये हफ्ता भरण्याची सोय त्यामध्ये आहे. वय साठ वर्षे झाल्यानंतर एकूण जमा रकमेच्या साठ टक्के रक्कम काढता येते. उर्वरित चाळीस टक्के रक्कम पेन्शन योजनेच्या लाभासाठी वळवून त्यातुन पेन्शन दिली जाणार आहे. 
या योजनेत सर्व्हीस प्रोव्हायडर म्हणून एलआयसी, एसबीआय, आयसीआयसीआय, एसबीएच, बजाज अलायंझ, स्टार युनिक आदी वित्तीय संस्था सहभागी आहेत. त्यांच्या माध्यमातून म्युचअल फंडसमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. या फंडसची होणाऱ्या प्रगतीनुसार योजनांचा लाभ मिळणार आहे. सर्व पोस्ट कार्यालयातून योजनेची नोंदणी केली जात आहे. पोस्टाची पहिल्यांदाच अशा प्रकारची योजना आली आहे. इतर वित्तीय संस्थाप्रमाणेच पेन्शन योजनेच्या स्पर्धेत आता पोस्ट देखील उतरले आहे. 

योजनेसाठी नोंदणी सूरू 
सोलापूर डाकघर येथे या पेन्शन योजनेची सुरूवात झाली आहे. त्याचा लाभ अनेक लाभार्थींना घेण्याच्या दृष्टीने नोंदणीची सोय केली आहे. 
- एस.एस. पाठक, प्रवर अधिक्षक, डाकघर सोलापूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Post also an innovative scheme in competition with the pension scheme