दिलासादायक : मंगळवेढा तालुक्‍यातील ऍक्‍टिव्ह रूग्णांची संख्या शंभराच्या आत 

The number of corona active patients in Mangalwedha taluka is less than one hundred
The number of corona active patients in Mangalwedha taluka is less than one hundred

मंगळवेढा (सोलापूर) : सतत वाढणाऱ्या कोरोना रुग्णाच्या संख्येने सर्वसामान्यांची धडकी भरत असली मंगळवेढा तालुक्‍यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या शंभराच्या आत आल्यामुळे मंगळवेढा तालुक्‍यासाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. आजअखेर तालुक्‍यातील कोविड सेंटरमध्ये 99 रूग्ण उपचार घेत असून इतर रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 
आज तालुक्‍यात 81 जणांची रॅपिड अँटीजने टेस्ट घेण्यात आल्या. यात 19 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. यात मंगळवेढा, सलगर बुद्रुक, लवंगी, चोखोमेळा नगर, ब्रम्हपुरी, आंधळगाव, लक्ष्मी दहिवडी, बावची या गावात 14 रुग्ण सापडले तर सोलापूरला पाठवलेल्या स्वॅबमध्ये पाच जण पॉझिटिव्ह सापडले असून त्यामध्ये मंगळवेढा 4 आणि ब्रह्मपुरी येथील एकाचा समावेश आहे. आजअखेर मंगळवेढा शहर व तालुक्‍यात 1296 रूग्ण सापडले तर आज 33 रुग्णांना कोविड सेंटरमधून डिस्चार्ज देण्यात आला. तर 99 रुग्णावर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत तालुक्‍यात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. 
तालुक्‍यामध्ये पहिला रुग्ण पाटकळ येथे सापडल्यामुळे नागरिकाची कोरोनाच्या भितीने गाळण उडाली होती. अशा परिस्थितीत तालुक्‍यात आरोग्य व महसूल, पोलिस प्रशासन यामध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना कोरोनाची वाढणारी साखळी नियंत्रित करण्यासाठी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले व तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, आरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे, मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी कष्ट घेत तालुक्‍यामध्ये रुग्णाचा वाढता आलेख कमी करण्यासाठी प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नाला यशही आले. विशेषत: उपविभागीय अधिकारी उदय भोसले हे पॉझिटिव्ह येऊन देखील सातत्याने प्रयत्नशील राहिले. त्यामुळे आता तालुक्‍यातील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या शंभराच्या आत आली आहे. त्यामुळे तालुक्‍यासाठी हे आशादायक आहे. 
मंगळवेढा शहरातील व्यापाऱ्यांनी मास्क असेल तरच माल मिळेल, अशी सूचना लावल्यामुळे शहरांमध्ये शिस्तीचे पालन केले जात आहे. अशाच पद्धतीचा अवलंब ग्रामीण भागात यापुढील काळात करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्य नागरिकांनी देखील यात पुढाकार महत्त्वाचा आहे. नागरिकांनी यापुढील काळात कोरोना साखळी नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार भारत भालके यांनी केले. 

संपादन : वैभव गाढवे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com