'या' तालुक्‍यात कोरोना रुग्णसंख्या पोहोचली एक हजाराच्या उंबरठ्यावर ! 

प्रशांत काळे
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

शुक्रवारी 99 स्वॅब व 10 रॅपिड ऍन्टीजेन अहवालात शहरातील नाळे प्लॉट 5,झाडबुके मैदान 9,लहूजी नगर 7, सुभाषनगर 2,वाणी प्लॉट 3,आडवा रस्ता 5,म्हाडा कॉलनी 1,भवानीपेठ 3,आशा टॉकीज रोड 7,मंगळवार पेठ 3,भीमनगर 1,कसबापेठ 1,मार्केट यार्ड 4,मनगिरे मळा 6,रोडगा रस्ता 1,कासारवाडी रोड 1,सावळे चाळ 1,रामभाऊ पवार चौक 1 असे आढळले आहेत. 

बार्शी(सोलापूर)ः बार्शी शहर अन्‌ तालुक्‍यात कोरोना विषाणू संसर्गाची वाढ सूरुच आहे. शुक्रवारी (ता.31) जिल्हा प्रशासनाकडून 109 प्राप्त झालेल्या स्वॅब व रॅपिड ऍन्टीजेन तपासणी अहवालामध्ये 66 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. बाधितांची एकूण संख्या 949 झाली आहे, अशी माहिती तहसीलदार डी.बी.कुंभार यांनी दिली. 

हेही वाचाः सोलापूर ग्रामिणमध्ये कोरोना बळीची शंभरी! या गावामध्ये नवे 194 पॉझिटिव्ह अन पाच जणांचा मृत्यू 

शुक्रवारी 99 स्वॅब व 10 रॅपिड ऍन्टीजेन अहवालात शहरातील नाळे प्लॉट 5,झाडबुके मैदान 9,लहूजी नगर 7, सुभाषनगर 2,वाणी प्लॉट 3,आडवा रस्ता 5,म्हाडा कॉलनी 1,भवानीपेठ 3,आशा टॉकीज रोड 7,मंगळवार पेठ 3,भीमनगर 1,कसबापेठ 1,मार्केट यार्ड 4,मनगिरे मळा 6,रोडगा रस्ता 1,कासारवाडी रोड 1,सावळे चाळ 1,रामभाऊ पवार चौक 1 असे आढळले आहेत. 

हेही वाचाः त्या दोघींनी कोरोना संकटात सलग शंभर दिवस जनमानसामध्ये केला आगळा प्रबोधनाचा जागर कुठे? ते वाचा 

अलिपूर रोड 2,आडवा रस्ता 8,दत्तनगर 1,भरतपूर 1 , ग्रामीण भागातील वैराग येथे 2,रुई 1,आगळगाव 1,पांगरी 1,सासुरे 1 असे सहाजण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. 
शहरातील 533 व ग्रामीण भागातील 416 असे 949 जण बाधित असून 439 जणांवर उपचार सुरु आहेत. शहर 67, वैराग 93, धोत्रे 2, आगळगाव 22, नारीवाडी 1, अरणगाव 1 असे 186 अहवाल प्रलंबित असल्याची माहिती कुंभार यांनी दिली. शहरात सध्या 138 कन्टोनमेंट झोन सुरू असून ग्रामीण भागात 52 आहेत. शहरातील 8 व ग्रामीणमधील 7 अशा 15 झोनची मुदत पूर्ण झाली आहे. 
 
संपादनः प्रकाश सनपूरकर 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona patients in this taluka has reached the threshold of one thousand!