सोलापुरात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रतिदिन पाच हजाराने वाढली 

toll plaza
toll plaza
Updated on: 

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. लॉकडाऊननंतर अनलॉकला परवानगी दिल्यानंतर सोलापुरातील स्थिती आता पूर्ववत होऊ लागली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरून सोलापुरात येणाऱ्या व सोलापुरातून बाहेर जाणाऱ्या प्रतिदिन वाहनांची संख्या जवळपास पाच हजाराने वाढली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावरील सावळेश्‍वर टोल नाक्‍यावरून येणाऱ्या वाहनांची ही संख्या असून अन्य मार्गाने सोलापुरात येणाऱ्या वाहनांचीही संख्या वाढली असल्याचे चित्र सोलापुरात आहे. 

लॉकडाऊनपूर्वी सावळेश्‍वर येथील टोल नाक्‍यावरून दिवसाला सरासरी साडेनऊ हजार वाहने येत व जात होती. सध्या हा आकडा साडेचौदा हजारापर्यंत गेला असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने दिली आहे. सोलापूर-पुणे महामार्गा शिवाय सोलापुरात हैदराबाद, विजापूर, तुळजापूर, मंगळवेढा, अक्कलकोट, बार्शी या प्रमुख मार्गावरून सोलापूर शहरात ये-जा करता येते. सोलापूर शहरासाठी वाहतुकीच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुणे महामार्गावरील वाहनांच्या संख्येत आता जवळपास प्रतिदिन पाच हजार वाहनांची संख्या वाढली आहे. 

सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण 12 एप्रिल रोजी सोलापुरात आढळला. अवघ्या दोन महिन्यात सोलापुरातील कोरोनाबाधितांची संख्या दीड हजारांच्यावर गेल्याने सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सोलापूर शहराबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक लोक सोलापूर शहरात येण्याचे टाळत आहेत. अशातच आता सोलापुरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. लॉकडाऊन कालावधीत काही प्रमाणात बंद असलेले ट्रान्स्पोर्ट सेवा आता पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसला प्रतिसाद नसल्याने प्रवासासाठी अनेक जण खासगी वाहनांचा वापर करू लागले आहेत. त्याचाही परिणाम वाहनांच्या वाढीव संख्येवर झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Solapur Temperature Touches 38°C as Farmers Await Rain
The silver padukas footwear were stolen from this very spot in the temple
netaji khandagale and kiran jamdade
Central Team Inspects Drought-Hit Villages and Crop Damage in Mangalwedha, Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com