"त्यांना' पोलिसांनी पाठलाग करुन पकडले अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 11 April 2020

राज्यात संचारबंदी असताना तालुक्‍यात काही ठिकाणी अवैध दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. या वेळी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले, सहायक पोलिस फौजदार लतिफ मुजावर, कल्याण ढवणे, संजय चंदनशिवे, संजय शिकतोडे, वैजनाथ कुंभार, सीमा सोनवणे यांनी आज रात्री साठेआठच्या सुमारास जवळा ते हातिद रस्त्यावर सापळा रचला.

सांगोला (सोलापूर) : राज्यात संचारबंदी व लॉकडाउन काळात बेकायदेशीर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी पाठलाग करून बोलेरो गाडीसह पकडले. त्यांच्याकडून देशी विदेशी कंपनीचा 99 हजार 840 रुपये किमतीचा दारूसाठा, घराशेजारी गोठ्यातून 53 हजार तीन रुपये, तसेच चार लाख रुपयांची बोलेरो गाडी असा पाच लाख 52 हजार 843 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सुनील नामदेव गव्हाणे व औदुंबर अण्णासाहेब लवटे (दोघे, रा. कडलास, ता. सांगोला) यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला. 
राज्यात संचारबंदी असताना तालुक्‍यात काही ठिकाणी अवैध दारूची वाहतूक सुरू असल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. या वेळी पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले, सहायक पोलिस फौजदार लतिफ मुजावर, कल्याण ढवणे, संजय चंदनशिवे, संजय शिकतोडे, वैजनाथ कुंभार, सीमा सोनवणे यांनी आज रात्री साठेआठच्या सुमारास जवळा ते हातिद रस्त्यावर सापळा रचला. त्यावेळी (एमएच 45 एन 3247) या बोलोरे गाडीतून बेकायदेशीर अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पाठलाग करून गाडीसह पकडले. गाडीतून मॅकडॉल, व्हिस्की, इम्पेरियल ब्ल्यू, ऑफिसर चॉइस, गोल्ड ड्रायनीज ओडका, बॅगपायपर, किंगफिशर, टॅंगो पंच असा देशी-विदेशी कंपनीचा सुमारे 99 हजार 840 रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला. त्यांच्याकडील चार लाख रुपये किमतीची बोलोरो गाडी पोलिसांनी जप्त केली. सुनील नामदेव गव्हाणे व औदुंबर अण्णासो लवटे (रा. कडलास, ता. सांगोला) यांच्याकडून सुमारे चार लाख 99 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या वेळी त्यांच्याकडे चौकशी केली असता 11 एप्रिलला पहाटे दोन वाजता सुनील नामदेव गव्हाणे यांच्या घराच्या बाजूस असलेल्या गोठ्यातून 53 हजार देशी-विदेशी कंपनीचा दारूसाठा असा पाच लाख 52 हजार 843 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस नाईक चंदशिवे यांनी सुनील नामदेव गव्हाणे व औदुंबर आण्णासो लवटे (दोघे रा. कडलास) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One lakh rs liquor seized in Solapur district