धक्‍कादायक ! बनावट सर्टिफिकेटद्वारे पुण्यातील सहा जणांची फसवणूक 

fraud
fraud
Updated on

सोलापूर : जनरल नर्सिंग मिडवायफरी सर्टिफिकेट देण्याचे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील सहा जणांना पाच लाखाला फसविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बोरामणी मोहोळकर तांडा (ता. दक्षिण सोलापूर) येथील बाळू गणू चव्हाण याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. धीरज नंदकिशोर ठाकूर (रा. खडकवासला, एकता विहार, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. 


पुणे येथील स्वारगेट भागात एका कार्यक्रमानिमित्त फिर्यादी धीरज ठाकूर आणि आरोपी बाळू चव्हाण यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या पत्नीचे ओटी असिस्टंट सर्टिफिकेट बदलून ओटी नर्सिंग सर्टीफिकीट देण्याचे आमिष दिले. त्यासाठी 40 हजार रुपये घेतले. तसेच बनावट सर्टिफिकेटही आरोपीने फिर्यादीला दिले. या प्रकारानंतर फिर्यादीच्या ओळखीच्या तबस्सुम खान यांना जनरल नर्सिंग मिडवाफरीचे सर्टिफिकेट देण्याकरिता आरोपीने 60 हजार रुपये घेतले. त्यानंतर आरोपीने जनरल नर्सिंग मिडवाफरी सर्टिफिकेटची गरज असलेल्या वंदना दिलीप चव्हाण, मेघा साळुंखे, सुरेखा वाघोले व सूर्यकांत चौरे यांच्याकडून एकूण पाच लाख रुपये घेतले. त्याबदल्यात त्यांना बनावट सर्टिफिकेट दिले. त्यातील सुजाता पुरी यांनी डिसेंबर 2019 मध्ये त्या सर्टिफिकेटची सत्यता पडताळणीसाठी ऑनलाइन तपासणी केली. त्यावेळी त्यांना ते सर्टिफिकेट दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे नोंद असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत फिर्यादीला माहिती दिली. त्यामुळे फिर्यादीने त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या सर्टिफिकेटचीही पडताळणी केली. त्यावेळी सर्व सर्टिफिकेट बनावट असल्याचे आढळून आले. दरम्यान, हा गुन्हा वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने पुढील तपासा वळसंग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. 


दहा मिनिटात पळविले पन्नास हजारांचे नेकलेस 
सोलापूर : घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले सुमारे 50 हजार रुपयांचे नेकलेस 10 मिनिटात लंपास केल्याची घटना विजयपूर रोडवरील भिमाई नगरात घडली. 


विजयपूर रोड परिसरातील भिमाई नगरात मुस्कान गुलाब उर्फ सुरज शेख (वय 22) बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घरातील काम करीत होत्या. त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा पुढे केला होता. घरातील कामानिमित्त त्या काही वेळासाठी दुसऱ्या ठिकाणी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेऊन अनोळखी चार इसम त्याठिकाणी पोहचले. त्यांनी घरातील किचनमधील लोखंडी कपाटातील ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले सुमारे 50 हजार रुपयांचे सोन्याचे नेकलेस पळविले. या प्रकरणी मुस्कान शेख यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चार अनोळखी व्यक्‍तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक श्री. बेंबडे हे या प्रकरणाचा तपास करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com