esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

airport
  • अर्थसंकल्पात अजित पवारांनी केली निधीची घोषणा 
  • सोलापूर अन्‌ पुणे विमानतळ उभारणीसाठी 78 कोटींची तरतूद 
  • पहिल्या टप्प्यात एक रन-वे उभारण्याचे नियोजन 
  • जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढाकारातून 32 हेक्‍टर जमिनीचे संपादन युध्दपातळीवर 

खुषखबर ! बोरामणी विमानतळाचा मार्ग मोकळा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : मुंबई, पुण्यानंतर आता सोलापुरात विकासाला वाव असल्याने उद्योगांचा कल सोलापुरकडे वाढत आहे. होटगी विमानतळ सुरळीत होण्यासाठी अडथळ्यांची शर्यत संपत नसल्याने आता बोरामणी विमानतळ पूर्ण करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. 2021 पर्यंत बोरामणी व पुणे विमानतळासाठी 78 कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्याची घोषणा वित्तमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केली. 

हेही नक्‍की वाचा : भाजप खासदार डॉ. महास्वामींवर 420 चा गुन्हा 


बोरामणी विमानतळासाठी आतापर्यंत 550 हेक्‍टर जमिनीचे संपादन केले आहे. आता 30 हेक्‍टरपर्यंत क्षेत्र संपादित करणे शिल्लक आहे. वन विभागाला 33 हेक्‍टर पर्यायी जमिनी देण्याचा प्रस्तावही नागपूरला पाठविला आहे. आता 2021 पर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करुन बोरामणी विमानतळाला सुरवात केली जाणार आहे. तत्पूर्वी, केंद्रीय हवाई उडाण मंत्रालयास पुढील कृती आराखडाही महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला सादर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी वित्तमंत्री अजित पवार यांनी बोरामणी विमानतळासाठी 50 कोटींचा निधी मंजूर केला, परंतु तो अद्यापही मिळालेला नाही. आता त्याची तरतूद अर्थसंकल्पात केल्याने निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. होटगी विमानतळ सुरळीत होण्यासाठी श्री सिध्देश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीसह अन्य 16 प्रकारचे अडथळे आहेत. या पार्श्‍वभूमीवर आता बोरामणी विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 

हेही नक्‍की वाचा : मनोरुग्ण महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेप 


भूसंपादनाची कार्यवाही युध्दपातळीवर 
बोरामणी विमानळासाठी 32 हेक्‍टर जमिनीच्या संपादनाची कार्यवाही युध्दपातळीवर सुरु असून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. या जमिनीचे संपादन झाल्यानंतर सुरवातीला एक रन-वे उभारला जाणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्यात टप्प्याटप्याने वाढ केली जाणार आहे. 2025 पर्यंत हे विमानतळ सुरळीत करण्याचे नियोजन महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने केले आहे. 

go to top