BREAKING....! सोलापूर महापालिकेत ऑनलाईन कर भरणा सुरु 

BREAKING....! सोलापूर महापालिकेत ऑनलाईन कर भरणा सुरु 
Updated on


सोलापूर : तांत्रिक कारणांसाठी एक एप्रिलपासून बंद ठेवण्यात आलेली महापालिकेतील ऑनलाईन कर भरणा प्रणाली आज गुरुवारपासून पुन्हा सुरु करण्यात आली. महापालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन मिळकतदारांना घरबसल्या आपला कर जमा करता येणार आहे. दरम्यान, शहरातील मिळकतदारांना त्यांच्या मिळकतकराची बिले आता थेट मोबाईलवर मिळणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेने या पद्धतीने बिले पाठविण्यास सुरवात केली आहे. त्याच धर्तीवर सोलापूर महापालिकाही मिळकतदारांना बिले पाठविणार आहे. महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावरून कर भरता येणार आहे. ही सुविधा बंद असल्यामुळे एप्रिलमध्ये मिळकत कराचा एकही रुपया जमा झाला नव्हता. आता ही सुविधा पुन्हा सुरु झाल्याने नागरिकांना घर बसल्या कर भरणे शक्‍य होणार आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने 19 मार्चपासून कर संकलन विभाग बंद केला आहे. त्यामुळे मिळकतकराचा भरणा थांबला आहे. तांत्रिक कारणामुळे ऑनलाइन भरणाही थांबला होता. मिळकतकराच्या थकबाकीच्या शास्तीवर देण्यात आलेल्या सवलतीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत होती. मात्र, कोरोनामुळे अनेक मिळकतदारांना कर भरता आला नाही. परिणामी महापालिकेस अंदाजे 12 ते 15 कोटींचे सद्यःस्थितीत नुकसान झाले. 

सध्या 2020-21 ची बिले तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, कोरोनामुळे ही बिले घरोघरी जाऊन वाटणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या धर्तीवर मिळकतदारांच्या मोबाईलवर मिळकतकराच्या रकमेचा मेसेज व महापालिकेची लिंक पाठविण्यात येणार आहे. ही लिंक उघडली की मिळकतकराची रक्कम किती आहे हे समजणार आहे, शिवाय ऑनलाइन कर भरण्याची सुविधा असणार आहे. मिळकतदारांना तीन प्रकारचे मेसेज पाठविण्यात येणार आहेत. मिळकतकराची रक्कम किती आहे, कर भरल्यानंतर जमा झालेली रक्कम आणि काही शिल्लक रक्कम असल्यास त्याची माहिती असे हे मेसेज असतील. 


असे आहे मेसेजचे प्रारूप 
प्रिय मिळकतकर धारक, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउन आदेशामुळे मिळकतकराचे सन 2020- 21चे देयक (बिल) आपणापर्यंत पोचवणे शक्‍य नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विनंती आहे की रांगा न लावता घरबसल्या ऑनलाइन सुविधेचा वापर करा. आपला मिळकतकर भरा व सवलत मिळवा. 
मिळकतकर बिल तपशील पाहणेव ऑनलाइन भरण्यासाठी  https://propertytax.solapurmunicipalcorporation.org/prop_tax_bill_print_all.aspx?strPropID=O/ या लिंकवर क्लिक करा...
घरीच रहा..सुरक्षित रहा.. 
सोलापूर महापालिका 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com