भागाईवाडीमध्ये समृध्द गाव योजनेचे ऑनलाईन प्रशिक्षण 

bhagaiwadi
bhagaiwadi
Updated on

सोलापूर : जल बचतीच्या साधनांचा वापर, जलव्यवस्थापन माहिती, पिक नियोजन, स्वच्छ पेयजल,मृदा व जलसंधारण, पोष्टीक गवताचे क्षेत्र, वृक्ष वाढ, मातीचे आरोग्य ही समृद्ध गाव स्पर्धेतील विभागनिहाय मुल्यांकन पध्दत आहे. पाणीदार गांव करणाऱ्या योध्यांनी आता त्यांचे समृद्ध गाव करण्यासाठी सहभागी होण्याचे आवहान पाणी फौऊंडेशन उत्तर सोलापूर तालुका समन्वयक आतिश शिरगिरे यांनी केले. 

पाणी फौऊशन समृद्ध गाव स्पर्धा 2020 मध्ये सहभागी झालेल्या भागाईवाडी (ता. उत्तर सोलापूर) गावात आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रशिक्षणात ते बोलत होते. यावेळी सरपंच कविता घोडके पाटील, सदस्य महादेव चौधरी, वैभव घोडके, सहाय्यक समन्वयक विजय घोडके, कृषी मित्र लहु घोडके, ग्रामविकास अधिकारी कृष्णात डवले, संगणक ऑपरेटर ज्ञानेश्वर साठे उपस्थित होते. 

पाणी फौऊंडेशन वॉंटर कप स्पर्धेत भागाईवाडी येथील नागरिकांनी फार मोठे योगदान देवून गाव पाणीदार केले. आता हे गाव समृद्ध करण्यासाठी सर्वांनी एकत्र या असे आवहान शिरगिरे यांनी केले. प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षिका ज्योती सुर्वे व रविंद्र पोमाणे यांनी स्पर्धेत विभागनिहाय एकुण 500 गुण, करावयाची कामे, नागरीकांचा सहभाग याची माहिती दिली.

उपस्थित प्रशिक्षणार्थींना ऑनलाईन प्रश्‍न विचारुन रंगत आणली. यावेळी भागाईवाडीकरांनी केलेले श्रमदान, कोरोना संकटाची जाणिव ठेवून मास्क, सामाजिक अंतर याची दक्षता ठेवून घेतलेल्या सहभागाचे कौतुक केले. प्रारंभी जलकलश पुजन सरपंच कविता घोडके पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी अंकुश घोडके, रामचंद्र पाटील, भारत घोडके, निलकंठ घोडके, महादेव घोडके, श्रीहरी घोडके, ओंकार घोडके, शिवाजी चौधरी, जयसिंग चौधरी, श्रीकांत पाटील, रामहरी घोडके, सुरज घोडके, नागनाथ चौधरी, विशाल घोडके, राकेश घोडके-पाटील, अंकिता पाटील, गायत्री घोडके, निकिता घोडके, ऐश्वर्या घोडके यांच्यासह शेतकरी, युवक व युवती, पदाधिकारी 45 जण या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com