esakal | #AskRohit : रोहित पवारांचा ट्विटरवर नेटकऱ्यांशी मुक्त संवाद
sakal

बोलून बातमी शोधा

#AskRohit : रोहित पवारांचा ट्विटरवर नेटकऱ्यांशी मुक्त संवाद

रोहित पवार यांना विचारलेले काही प्रश्‍न 
मेगा भरती, तरुणांच्या बेरोजगारीची समस्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्‍न, शेतकऱ्यांना हमीभाव, महापरीक्षा पवित्र पोर्टल बंद करणे, शिक्षकभरती, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, पाणीप्रश्‍न, शेतकऱ्यांच्या विकासासाठीच्या योजना, राज्यातून खेळासाठी काही पाऊले, कोपर्डी खटला, राज्यसेवा आयोगाच्या परीक्षांच्या निकालाला होत असलेला विलंब, शेतकरी कर्जमाफी योजना असे एक ना अनेक प्रश्‍न नेटकऱ्यांनी रोहित पवार यांनी विचारले आहेत. 

#AskRohit : रोहित पवारांचा ट्विटरवर नेटकऱ्यांशी मुक्त संवाद

sakal_logo
By
वैभव गाढवे

सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणातील आजच्या तरुण नेत्यांमधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे आमदार रोहित पवार. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे या पलीकडे आमदार रोहित पवार यांनी आपली राजकारण आणि समाजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा प्रत्यय सातत्याने आला आहे. तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांच्या लोकांत रोहित पवार सहज मिसळून जातात, त्यांच्याशी संवाद करतात. तसेच फेसबुक, ट्विटर या सोशल मीडियावर रोहित यांना मानणारा मोठा तरुण वर्ग आहे. रोहित पवार सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईशी सातत्याने संपर्कात असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते तरुणांच्या प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर देतात. तसेच त्यांच्या अडचणीच्या वेळी मदतीला धावून जातात. त्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला आहे. 


आज सायंकाळी पाच वाजल्यापासून पुन्हा एकदा ट्‌विटरच्या माध्यमातून तुम्हा सर्वांशी संवाद साधणार असून तुम्हा सर्वांच्या प्रश्‍नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करणार आहे. #AskRohit हॅशटॅग वापरून तुमचे प्रश्‍न आणि सूचना माझ्यापर्यंत नक्की पोचवा, असे आवाहन रोहित पवार यांनी आज दुपारी एक वाजून 19 मिनिटांनी केले. पवार यांच्या आवाहनानंतर महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील हजारो तरुणांनी आतापर्यंत राज्याच्या राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कृषी, सांस्कृतिक, युवकांच्या समस्या, महिलांच्या समस्या अशा एक ना अनेक प्रश्‍नांवर रोहित यांना हजारो प्रश्‍न विचारले आहे. ट्विटरवर #AskRohit हा हॅशटॅग वापरून विविध क्षेत्रांतील तरुणांनी तसेच मान्यवरांनी प्रश्‍नांचा अक्षरश: पाऊस पाडला आहे. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यानंतर #AskRohit हा हॅशटॅग टॉपला ट्रेडिंगवर आहे. 

हेही वाचा - भाजपला नव्हे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पाठिंबा दिला होता : संजय शिंदे 

#AskRohit हा हॅशटॅग वापरून नेटकऱ्यांनी रोहित पवार यांच्याशी मुक्त संवाद साधला आहे. तसेच रोहित पवार यांनीही नेटकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली आहेत. अनेक नेटकऱ्यांनी रोहित यांना टीका करणारे प्रश्‍न विचारले आहेत. मात्र, कुठलाही राग किंवा त्रागा व्यक्त न करता या सर्व प्रश्‍नांना रोहित यांनी समाधानकारक उत्तरे दिली आहेत. मेगा भरती, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, हमीभाव, महापरीक्षा पवित्र पोर्टल दुरुस्ती, शिक्षकभरती, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, पाणीप्रश्‍न, शेतकऱ्यांच्या विकासासाठीच्या योजना, राज्यातून खेळासाठी काही पाऊले, कोपर्डी खटला, राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा, शेतकरी कर्जमाफी योजना असे एक ना अनेक प्रश्‍न नेटकऱ्यांनी रोहित पवार यांनी विचारले आहेत. या सर्व प्रश्‍नांवर रोहित यांनी समाधानकारक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे.