परिस्थितीवर मात करत मल्लम्मांनी भजनाच्या माध्यमातून उभा केला जीवनाचा आदर्श !

mallama bukka.jpg
mallama bukka.jpg

अक्कलकोट (सोलापूर) : दृष्टीदोषावर मात करत तोळणूरच्या मल्लम्मा अक्का यांनी एकटीने वयाच्या चौथ्या वर्षापासून केवळ भजनाच्या आधारावर स्वतःचे जीवन उभे केले नव्हे तर ते यशस्वी करून दाखवले. तब्बल पाच दशकापासून त्यांचे भजन हे पंचक्रोशीमध्ये नामांकित गायनशैलीचे भजन म्हणून ओळखले जाते. जीवाभावाच्या सहकाऱ्यांच्या मदतीने विपरित परिस्थितीवर मात करत गायन कलेच्या आधाराने त्यांनी केलेली ही वाटचाल अत्यंत आगळीवेगळी आहे. 

मलम्मा बुक्का या मल्लिकार्जुन अक्कन बळग संघ तोळणूर याच्या वतीने भजन गाण्याचे काम करीत आहेत. त्यांना इरम्मा कुर्ले, सुमित्रा पोतदार, विजयालक्ष्मी पाटील, सखाराम पोतदार व इतरांचे सतत सहकार्य आजवर मिळत आलेले आहे. वयाच्या चार वर्षाच्या असताना त्यांना दोन्ही डोळ्यास अचानक अंधत्व आले आहे. तेव्हा त्या भजन शिकल्या. त्या स्वतःच्या आवडीने व दुसऱ्यांच्या तोंडी ऐकून शेकडो भजने, वचने व इतर गीते मुखोद्गत केली आहेत. 

त्या 1968 पासून गावागावातील यात्रा, पालखी सोहळे व इतर कार्यक्रमासाठी बोलावणे आल्यानंतर त्या सतत त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन गात राहिल्या. त्याला आता 52 वर्षे होत आली आहेत. दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही त्यांचे सहकारी त्यांना हात धरून नेतात तसेच इतर आवश्‍यक मदत करतात. त्यामुळे कोणताही त्रास मात्र आजपर्यंत जाणवला नाही. ग्रामस्थांची देखील सतत सहकार्य करण्याची भूमिका राहत आलेली आहे. 
आता उतार वय, कमी होत चाललेली स्मरणशक्ती तसेच कोरोना काळ यामुळे भजनाच्या माध्यमातून मिळणारे अल्पशे उत्पन्न देखील आता बंद झाले आहे. मलम्मा यांच्या पाठीमागे सध्या आई, वडील भाऊ व बहीण कोणीही हयात नाहीत की कुठली शेतीदेखील अस्तित्वात नाही. 
सध्या मलम्मा या गावातील सोमशेखर वाले व परिवार यांच्याकडेच राहत आहेत. महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवरील कित्येक गावात जाऊन त्या भजनाचे कार्यक्रम सहकाऱ्यांसोबत करतात. अतिशय श्रवणीय आवाजात गाणाऱ्या मलम्मा यांचे विवीध धार्मिक कार्यक्रमात भजनाचे कार्यक्रम वर्षभर सुरूच असतात. मात्र काही महिन्यापासून त्यांना कोरोना संकट व उतारवयामुळे विवीध आजाराचा खर्च व प्रासंगिक खर्च झेपेल का नाही अशी चिंता त्यांना लागली आहे. त्यांना आता खऱ्या मदतीची गरज उतारवयात येणाऱ्या विविध आजारांवर व इतर प्रासंगिक खर्चाच्या लागणाऱ्या गोष्टींची आहे. 


कोणाला दोष न देता जीवन सुखकर बनवावे 
मला वयाच्या चौथ्या वर्षी अंधत्व आले पण मी खचून न जाता गावकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण आयुष्य भजन गाऊन आनंद मिळविला व लोकांचे मनोरंजन केले. मी आता थकत आली आहे. नशिबाला दोष न देता आहे त्या परिस्थितीत समाधान मानून आपले जिवन सुखकर बनवावे. 
- मलम्मा बुक्का, भजन गायिका तोळणूर 

 
संपादन ः प्रकाश सनपूरकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com