"या' पोलिसांमागील शुक्‍लकाष्ट संपेना ! कैदी पलायनप्रकरणी दोन पोलिस निलंबित, तिघांची बदली 

Police
Police

मंगळवेढा (सोलापूर) : कोरोना पॉझिटिव्ह कैद्यासमवेत बोकड पार्टी प्रकरणी दोन पोलिस निलंबित झाल्याची घटना ताजी असतानाच, कैदी पलायन प्रकरणीही दोन पोलिस निलंबित तर तिघा पोलिसांची बदली करण्यात आल्यामुळे मंगळवेढा पोलिसांच्या मागे असलेले शुक्‍लकाष्ट काही केल्या संपेना. कैदी पळून जाण्याची घटना यापूर्वी घडूनही दुर्लक्ष करणारे अधिकारी यातून सुटले, पण कनिष्ठ कर्मचारी मात्र अडकले. 

पोलिस कॉन्स्टेबल उदय ढोणे, बजरंग माने यांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आजारी असल्याचे कारण दाखवून उपचाराच्या निमित्ताने पंढरपूर तालुक्‍यातील आंबे येथे कैद्याबरोबर बोकड पार्टीसाठी हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी तो आरोपी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. या घटनेस जबाबदार म्हणून या दोघा पोलिसांना निलंबित करण्यात आले. तर कैद्यांसह पोलिस अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे पोलिसांत खळबळ उडाल्याची घटना ताजी असतानाच, तीन कैदी सब जेलमधून पळून गेले होते. याप्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले तर तीन पोलिसांची मुख्यालयात बदली करण्यात आली. यामुळे अगोदरच पोलिस दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असताना पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमुळे पोलिसांना आणखी तणावाखाली काम करण्याची वेळ आली आहे. 

आरोपीचे जेलमधून पलायन, पॉझिटिव्ह आरोपीसमवेत केलेली पार्टी यामुळे पोलिस खाते बदनाम झाले असले, तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करून देखील जनता बेभान झाल्यामुळे पोलिसांनी कारवाईचा फास आवळला आहे. अशातच विविध गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी नागरिकांना केलेल्या दंडाची रक्कम जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक ठरली तर पोलिस कोरोना बंदोबस्तात गुंतल्याचे पाहून काही अवैध धंदे करणाऱ्यांनी देखील आपले हातपाय पसरण्याचा प्रयत्न केला. परंतु यावर पोलिसांनी कारवाई करून अवैध धंद्यांवरही जरब बसविली. त्यांच्या कामगिरीमुळे व अन्य तालुक्‍यांची रुग्णसंख्या पाहता तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या अटकावासाठी नियोजनबद्ध कामगिरी सुरू असल्याचे दिसून येते. 

सब जेलमधून आरोपी पळून जाण्याची घटना यापूर्वी घडल्या असताना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आरोपी पळून जाण्याबाबत अटकाव करणे अपेक्षित होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे पुन्हा आरोपीला पळून जाण्याची संधी मिळाली. वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाचा फटका मात्र मंगळवेढ्यातील दोघा कनिष्ठ पोलिसांना निलंबनाच्या कारवाईमुळे बसला. तर तिघांना बदलीला सामोरे जावे लागले. तालुक्‍यातील वाढती लोकसंख्या विचारात घेता अतिरिक्त पोलिस ठाणे व पोलिसांचे पुरेसे मनुष्यबळ असणे अपेक्षित असताना निलंबन आणि बदलीमुळे कुमकुवत होत असलेल्या पोलिस अधिकारी तोकड्या कर्मचाऱ्यांच्या जोरावर जनतेच्या सुरक्षिततेसह कोरोनाच्या संकटालाही सामोरे जाण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com