esakal | नीरा कालव्याचे बचत झालेले पाणी पंढरपूरला मिळावे : आमदार भालके 
sakal

बोलून बातमी शोधा

नीरा कालव्याचे बचत झालेले पाणी पंढरपूरला मिळावे : आमदार भालके 

भाजप सरकारकडून अन्याय 
आमदार भालके म्हणाले, या बचत झालेल्या पाण्यावर पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा प्रथम हक्क आहे. असे असतानाही मात्र बचत झालेले पाणी भाजप सरकारच्या काळात सांगोला तालुक्‍याला देण्यात आले. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर भाजप सरकारच्या काळात अन्याय झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आजही आहे.

नीरा कालव्याचे बचत झालेले पाणी पंढरपूरला मिळावे : आमदार भालके 

sakal_logo
By
भारत नागणे

पंढरपूर : फलटण आणि माळशिरस भागात नीरा उजव्या कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे. त्यानंतर आता कालव्यातील पाण्याचे बाष्पीभवन आणि परक्‍युलेशन कमी झाले आहे. बचत झालेले पाणी पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना मिळावे अशी, मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केल्याची माहिती आमदार भारत भालके यांनी आज दिली. 
आमदार भालके म्हणाले, नीरा उजव्या कालव्याचे गेल्या दोन वर्षात फलटण आणि माळशिरस तालुक्‍यात अस्तरीकरण करण्यात आले. अस्तरीकतरणाच्या कामानंतर कालव्यातून वाया जाणाऱ्या पाण्याची मोठी बचत झाली आहे. या बचत झालेल्या पाण्यावर पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा प्रथम हक्क आहे. असे असतानाही मात्र बचत झालेले पाणी भाजप सरकारच्या काळात सांगोला तालुक्‍याला देण्यात आले. त्यामुळे तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर भाजप सरकारच्या काळात अन्याय झाल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आजही आहे. 

हेही वाचा - पालकमंत्री वळसे पाटील शुक्रवार, शनिवार सोलापूरच्या दौऱ्यावर 

पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना समान पाणी मिळावे अशी आमची मागणी आहे. समान वाट न मिळाल्यास अन्याय सहन करणार नाही. पंढरपूरच्या वाट्याचे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसपंदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तशी मागणी देखील मी केली आहे. लवकरच यावर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. उन्हाळ्यात या भागातील शेतकऱ्याना पाणी मिळावे यासाठी आणखी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. आघाडी सरकारच्या काळात पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळेल असा विश्वासही आमदार भालते यांनी व्यक्त केला. 

go to top