पंढरपुरात युवक कॉंग्रेसचे इंधन दरवाढीच्या विरोधात विश्वासघात आंदोलन

In Pandharpur, the Youth Congress has staged a betrayal agitation against the fuel price hike.jpg
In Pandharpur, the Youth Congress has staged a betrayal agitation against the fuel price hike.jpg

पंढरपूर (सोलापूर) : पेट्रोल, डिझेल आणि गॅस दर या दरवाढी विरोधात आज तालुका युवक कॉंग्रेसचे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे अध्यक्ष पिंटू भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीतदादा तांबे, जिल्हा प्रभारी गणेशदादा जगताप यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किंमतीमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब जनता हैराण झाली आहे. दररोजच्या वाढत्या इंधन दरवाढीमुळे महागाई वाढली आहे. त्याचा थेट परिणाम सर्व सामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारावर झाला आहे.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरिबांचे जगणे अवघड झाले आहे. याचा निषेध म्हणून आज पंढरपूर युवक कॉंग्रेसच्यावतीने शहरातील शहा पेट्रोलपंपासमोर इंधन दरवाढी विरोधात आंदोलन केले. केंद्र सरकारने इंधन दरवाढ तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा युवक काँग्रेसचे विधान सभा अध्यक्ष पिंटू भोसले यांनी दिला आहे.

यावेळी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'पहिले इस्तमाल करो, फिर विश्वास घात करो' अशा आशयाचा फलक हातात घेवून मोदी सरकारच्या विरोधात घोषणा बाजी केली. यावेळी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद भोसले, जिल्हा उपाध्यक्ष नितीन शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष शंकर सुरवसे, शहराध्यक्ष राजेश भादुले, सरचिटणीस नागेश गंगेकर, शहराध्यक्ष अमित डोंबे, शहर कार्याध्यक्ष सागर कदम, ओबीसी जिल्हाध्यक्ष समीर कोळी, विधानसभा उपाध्यक्ष कृष्णा कवडे, शहराध्यक्ष मधुकर फलटणकर, सरचिटणीस अमर सुर्यवंशी, सतीश आप्पा शिंदे, अमित अवघडे, सुहास भाळवणकर, दत्तात्रय बडवे, देवानंद इरकल, मिलिंद अढवळकर, श्यामसुंदर बिलकी, संतोष ताटे, शंकर शिंदे, चेतन बागल, श्रीकांत चव्हाण, उमेश शिंदे, विशाल घोडके, रोहन भोसले, मनोज माळी यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com