सोलापुरात 178 शिक्षकांना कोरोना ! पालकांमध्ये भीती; 30 टक्केही पालकांनी दिले नाही संमतिपत्र 

तात्या लांडगे 
Sunday, 22 November 2020

राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तत्पूर्वी सरकारने या वर्गांवरील शिक्षकांची कोरोना टेस्ट केली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 178 शिक्षकांना कोरोना असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी संमतिपत्र द्यायला नकार देत मुलांना घरीच ठेवणे पसंत केले आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यात सुमारे दीड हजार शाळांमध्ये सव्वालाख मुले नववी ते बारावीचे शिक्षण घेत आहेत. मात्र, आतपर्यंत 30 टक्केही पालकांनी संमतिपत्र दिलेले नाही. 

सोलापूर : राज्यातील नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. तत्पूर्वी सरकारने या वर्गांवरील शिक्षकांची कोरोना टेस्ट केली. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 178 शिक्षकांना कोरोना असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालकांनी संमतिपत्र द्यायला नकार देत मुलांना घरीच ठेवणे पसंत केले आहे. सोलापूर शहर- जिल्ह्यात सुमारे दीड हजार शाळांमध्ये सव्वालाख मुले नववी ते बारावीचे शिक्षण घेत आहेत. मात्र, आतपर्यंत 30 टक्केही पालकांनी संमतिपत्र दिलेले नाही. 

शिक्षण विभागाने 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्यासाठी आवश्‍यक असलेले विषय शिक्षक व कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य विभागातर्फे ग्रामीणमधील आरोग्य केंद्र व नगरपालिका क्षेत्रातील केंद्रात 114 ठिकाणी चाचणीची सोय केली होती. शुक्रवारी व शनिवारी सर्वाधिक म्हणजे 10 हजार 799 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अँटिजेन चाचण्या केल्या. यामध्ये 176 शिक्षक पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील 3 हजार 406 शिक्षकांमध्ये लक्षणे दिसल्याने आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. 

तालुकानिहाय अँटिजेन टेस्ट झालेली संख्या व पॉझिटिव्ह शिक्षक 
अक्कलकोट : 1040 (दोन), बार्शी : 1918 (15), करमाळा: 422 (दोन), माढा : 932 (10), मोहोळ : 717 (पाच), माळशिरस : 1112(20), मंगळवेढा : 841 (22), उत्तर सोलापूर : 394 (11), पंढरपूर : 1540 (66), सांगोला : 1122 (21), दक्षिण सोलापूर : 761 (चार). 

सोलापुरातील शिक्षक निगेटिव्ह 
सोलापूर शहरात 17 ते 21 नोव्हेंबरपर्यंत 1 हजार 199 शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यापैकी 330 अहवाल प्राप्त झाले आहेत. सर्व शिक्षक निगेटिव्ह आले आहेत. उर्वरित 869 शिक्षकांचा अहवाल अद्याप यायचा आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents in Solapur did not consent to send their children to school for fear of Corona