2003 मधील "सार्स', 2012 मधील "मर्स' अन्‌ आता... 

अशोक मुरुमकर 
Thursday, 9 April 2020

कोरोनावर अद्याप औषध नसल्याने काळजी घेणे हा एकच उपाय आहे. कोरोनाबाबत अनेक नागरिकांच्या मनात शंका आहेत. त्या शंकांची उत्तरे या पुस्तकातून देण्यात आली आहेत. यात घाबरून न जाता नागरिकांनी काळजी कशी घ्यावी, ते नमूद केले आहे. "कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव असून ते भारताला पूर्वीपासून माहीत आहेत.

सोलापूर : जगभर थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्याचाच भाग म्हणून सरकारने सर्वांना माहिती व्हावी व घाबरून न जात काय काळजी घ्यावी याची जगजागृती करण्यासाठी माहिती पुस्तक काढले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पुस्तक पीडीएफ स्वरूपात मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 
कोरोनावर अद्याप औषध नसल्याने काळजी घेणे हा एकच उपाय आहे. कोरोनाबाबत अनेक नागरिकांच्या मनात शंका आहेत. त्या शंकांची उत्तरे या पुस्तकातून देण्यात आली आहेत. यात घाबरून न जाता नागरिकांनी काळजी कशी घ्यावी, ते नमूद केले आहे. "कोरोना हे एका विषाणू समूहाचे नाव असून ते भारताला पूर्वीपासून माहीत आहेत. 2003 चा "सार्स' किंवा 2012 चा "मार्स' हे कोरोना विषाणूपासून होणारे आजार आहेत. परंतु, डिसेंबर 2019ला चीनच्या वुहान शहरात सुरू झालेल्या या उद्रेकात आढळलेला कोरोना विषाणू पूर्वीपेक्षा वेगळा आहे. त्याला नॉवेल अर्थात नवीन कोरोना विषाणू असे संबोधण्यात येते. जागतिक आरोग्य संघटनेने या आजारास "कोविड- 19' असे नाव दिले असल्याचे त्यात नमूद आहे. या कोरोनाचे मूळ स्थान कोठे हे ते नमूद करताना, "कोरोना हा प्राणी जगातून मानवाकडे आलेला विषाणू आहे. तो मुख्यत्वे वटवाघळात आढळतो. बेसुमार जंगलतोड, वाढते शहरीकरण, कच्चे मांस खाण्याची सवय आदींमुळे प्राणी जगातील सूक्ष्मजीव मानवात प्रवेश करतात.' 
याशिवाय कोरोनाला रोखण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्‍यक आहे. तो कसा पसरतो याची माहिती दिली आहे. कोरोनाची लक्षणे, कोरोना विषाणूपासून होणारा आजार पसरतो कसा?, कोरोना आजार होऊ नये याबाबत काळजी कशी घ्यावी, अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे सांगत नागरिकांच्या मनात भीती निर्माण होऊ नये, त्यांना जागरूक करण्यासाठी त्यांच्या मनातील प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The PDF Book of Corona information from the Maharashtra government