पेहे ग्रामपंचायतीवर परिचारक गटाची 25 वर्षाची सत्ता कायम

The Pehe Gram Panchayat has been ruled by the Paricharak group for 25 years.jpg
The Pehe Gram Panchayat has been ruled by the Paricharak group for 25 years.jpg

पंढरपूर (सोलापूर) : पेहे (ता.पंढरपूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत परिचारक गटाने पु्न्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिध्द केले आहे. गेल्या 25 वर्षापासून असलेली परिचारक गटाची सत्ता कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे यांना कायम राखली आहे. 

येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी (ता.26) पार पडली. यामध्ये आमदार प्रशांत परिचारक गटाच्या सुरेखा सोमनाथ गायकवाड यांची सरपंचपदी तर धनाजी रामदास गायकवाड यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली. 

दोन्ही पदासाठी झालेल्या निवडणुकीत सरपंच सुरेखा गायकवाड व उपसरपंच धनाजी गायकवाड हे चार विरुध्द पाच मतांनी विजयी झाले. त्यानंतर परिचारक गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाची उधळण करत व फटाक्यांची आतषबाजी करत एकच जल्लोष केला. त्यानंतर बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे यांच्या हस्ते नुतन सरपंच व उपसरपंचांचा सत्कार करण्यात आला.

येथील ग्रामपंचायत निवडणुकीत परिचारक गटाच्या विरोधात इतर सर्व गट एकत्रित आले होते. अटीतटीच्या निवडणुकीत बाजार समितीचे उपसभापती विवेक कचरे यांनी शेतकरी संघटनेचे नितीन बागल, शाळा कृती समितीचे कार्याध्यक्ष मारुती गायकवाड यांना सोबत घेवून निवडणुकीत 9 पैकी 5 जागांवर विजय मिळवला होता.

अपेक्षेप्रमाणे सरपंच व उपसपंचपदाच्या निवडणुकीतही परिचारक गटाने बाजी मारली. येथील ग्रामपंचायतीवर गेल्या 25 वर्षापासून परिचारक गटाची सत्ता आहे. ती येथील कार्यकर्त्यांनी कायम ठेवली आहे.

सरपंच निवडीवेळी ग्रापंचायत सदस्य शंकर शिंदे, रेखा गायकवाड, नागिन वाघमारे, माजी सरपंच बाऴासाहेब शिंदे, महादेव साळुंखे, पितांबर गायकवाड, पांडुरंग नायकुडे, पांडुरंग वाघमारे, विष्णूदास साळुंखे, अरुण गायकवाड, विजय मोकळे, पांडुरंग चव्हाण, हणमंत जगताप, समाधान नायकुडे, भगवान बेलदार, शेखर बेलदार आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com