अन्नदानाच्या चळवळीत लोकांनी पुढे यावे : अभिनेते सुमित पुसावळे यांचे आवाहन

मिलिंद गिरमे
Saturday, 21 November 2020

पेनूर येथील गवळी परिवाराच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.या 17व्या वर्षी मात्र कोरोना महामारीमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने सर्वजण अडचणीत आले आहेत.ही अडचण लक्षात घेऊन गवळी परिवाराचे कुटुंबप्रमुख यशवंत गवळी यांच्याकडून संपूर्ण पेनूर गावातील 1800 कुटुंबाला फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले

पेनूर(सोलापूर): कोरोना महामारीमुळे सर्वांची अवस्था दयनीय झालेली असताना पेनूर येथील गवळी परिवाराने संपूर्ण गावाला फराळ साहित्य वाटपाचा आदर्शवत उपक्रम राबविला आहे. समाजातील इतर लोकांनी पण त्यांचा आदर्श घेत अन्नदानाच्या चळवळीत पुढे यावे असे प्रतिपादन बाळूमामा फेम अभिनेते सुमित पुसावळे यांनी केले. 

हेही वाचाः गटशेतीतून सापडेल प्रगतीचा मार्ग 

पेनूर येथील गवळी परिवाराच्या वतीने गेल्या 16 वर्षांपासून फराळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.या 17व्या वर्षी मात्र कोरोना महामारीमुळे उद्योगधंदे बंद पडल्याने सर्वजण अडचणीत आले आहेत.ही अडचण लक्षात घेऊन गवळी परिवाराचे कुटुंबप्रमुख यशवंत गवळी यांच्याकडून संपूर्ण पेनूर गावातील 1800 कुटुंबाला फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी प्रगतशील बागायतदार मारुती गवळी, गिरीश गवळी, गौरव गवळी, सौरव गवळी,सचिन डोके,विकास डोके,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील बागायतदार भारत चवरे,पोलीस निरीक्षक विजयकुमार डोके,माजी सरपंच हरिश्‍चंद्र चवरे,शिवसेना नेते चरणराज चवरे,भाजपचे सरचिटणीस रमेश माने,ग्रा.प.सदस्य चिंतामणी चवरे, युवा उद्योजक सागर चवरे,प्रगतशील बागायतदार परमेश्वर राऊत,प्रसिद्ध डाळिंब व्यापारी राजू गवळी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे,युवा नेते सचिन चवरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. 

हेही वाचाः यंदा कार्तिकीसाठीही दिंड्या पंढरपूरकडे येऊ शकणार नाहीत 

गवळी परिवारातर्फे पेनूर गावातील गरजूंना दिवाळीनिमित्त घराघरात पोहोचलेल्या बाळूमामा उर्फ अभिनेता सुमित पुसावळे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आले. यावेळी नागनाथ चवरे, दादाराव सलगर, तुकाराम माने, तुकाराम शेंबडे, विजय चवरे, दिलीप माने, दादाराव माळी, राजू राजगुरू, नागेश गायकवाड आदी उपस्थित होते. 

अडचणीच्या काळात गवळी परिवाराकडून सदैव पुढे असणार 
-गेल्या सोळा वर्षांपासून सामाजिक बांधिलकी जपत अविरतपणे गोरगरीब बांधवांची दिवाळी गोड केली आहे.यावेळेस कोरोना महामारीचा अतिरेक झाल्याने ग्रामीण भागातील लोकांची अवस्था बिकट झाली आहे त्यामुळे पेनूर गावातील सर्वच 1800 कुटुंबाला या दिवाळीनिमित्त फराळसाहित्य वाटप करण्यात आले.यापुढे देखील अशाच प्रकारचे लोकहितवादी व मदतीचे हात गवळी परिवाराकडून सदैव पुढे राहतील. 
- यशवंत गवळी,अभियंता तथा कुटुंबप्रमुख गवळी परिवार पेनूर  
 

संपादनः प्रकाश सनपूरकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: People should come forward in the food donation movement: Actor Sumit Pusavale's appeal