"या' आर्मीचे "पंतप्रधान कार्यालयाला फोन करो' आंदोलन यशस्वी

दत्तात्रय खंडागळे 
Monday, 10 August 2020

किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी पंतप्रधानांना अत्यंत महत्त्वपूर्ण सात राष्ट्रीय मागण्या सादर केल्या आहेत. या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या मागण्यांमध्ये शेतकरी, कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्या जनतेच्या खात्यावर थेट पंधरा हजार रुपये कोरोना मदत निधी म्हणून जमा करावेत, पंतप्रधान मोदी यांनी इतर कार्यक्रम, भावनिक भाषणे व प्रसिद्धी इव्हेंट आता बंद करून फक्त औषधे आणि लस याबाबतचे राष्ट्रीय नियोजन व कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करावे, भारतीय सैन्याला सर्व धर्मांच्या व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मानवंदना द्यावी, कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांना नेमकी कोणती औषधे व कोणते उपचार दिले जातात हे जनतेसाठी अधिकृतपणे जाहीर करावे यासह सात मागण्यांचा या आंदोलनामध्ये समावेश होता.

सांगोला (सोलापूर) : कोरोनाच्या संकटात जनतेच्या प्रश्नांशी निगडित सात महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीच्या वतीने सोमवारी (ता. 10) पंतप्रधान कार्यालयास फोन करण्याचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनास महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही हजारो लोकांनी पंतप्रधान कार्यालयाला फोन केल्याची माहिती किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक प्रफुल्ल कदम यांनी दिली. 

हेही वाचा : सकाळ इम्पॅक्‍ट ! अखेर राज्यातील ग्रंथालयांना मिळाले जीवदान; "इतक्‍या' कोटींचा निधी मंजूर 

किसान आर्मी व वॉटर आर्मीचे संस्थापक नेते प्रफुल्ल कदम यांनी पंतप्रधानांना अत्यंत महत्त्वपूर्ण सात राष्ट्रीय मागण्या सादर केल्या आहेत. या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्र सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या मागण्यांमध्ये शेतकरी, कष्टकरी व मोलमजुरी करणाऱ्या जनतेच्या खात्यावर थेट पंधरा हजार रुपये कोरोना मदत निधी म्हणून जमा करावेत, पंतप्रधान मोदी यांनी इतर कार्यक्रम, भावनिक भाषणे व प्रसिद्धी इव्हेंट आता बंद करून फक्त औषधे आणि लस याबाबतचे राष्ट्रीय नियोजन व कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करावे, भारतीय सैन्याला सर्व धर्मांच्या व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन मानवंदना द्यावी, कोरोना आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांना नेमकी कोणती औषधे व कोणते उपचार दिले जातात हे जनतेसाठी अधिकृतपणे जाहीर करावे यासह सात मागण्यांचा या आंदोलनामध्ये समावेश होता. 

हेही वाचा : उशिरा होईना मिळाला सन्मान ! इतिहासाच्या पुस्तकात मानवतावादी डॉ. कोटणीसांची माहिती 

या आंदोलनामध्ये देशभरातून पंतप्रधान कार्यालयात सतत फोन येत असल्याने पंतप्रधान कार्यालयातील फोन सतत बिझी लागत होता. पंतप्रधान कार्यालयात असे आंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती प्रफुल्ल कदम यांनी दिली. 

जनतेतून हजारो फोन झाल्यानंतर आता जर पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय भाषणात आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही, तर वेगळ्या पद्धतीने राष्ट्रव्यापी आंदोलन करणार असल्याचे प्रफुल्ल कदम यांनी सांगितले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Phone agitation by farmers and water army at PM's office successful