७५ वर्षांच्या आजीची कविता ऐकाच (Video)

अशोक मुरूमकर
Tuesday, 25 February 2020

अनुसया तळपाडे यांचा जन्म 1944 मध्ये झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील साकिर वाडी हे त्यांचे जन्म! सध्या त्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे राहतात. पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण त्यांचे साकिरवाडीत झाले. चौथीला शिक्षणासाठी त्या नाशिकला गेल्या.

सोलापूर :आवड असली की सवड मिळतेच’ ही म्हण तशी जुनीच. अगदी त्याच म्हणीप्रमाणे एखाद्याला कितीही काम असलं तरी ज्याची आवड आहे त्याला वेळ दिला जातोच. अन्‌ आवड नसेल तर सवड असून सुद्धा कोणत्याही कामात अनेक कारणं सांगणारी मंडळी आपण पाहतो. अगदी त्याचप्रमाणे संसाराचा गाडा हाकताना ७५ वर्षांच्या आजी केवळ आवड असल्याने वाचनाचा छंद जोपासत आहेत. आजही त्यांची स्मरणशक्ती कायम आहे. त्यांच्या अभ्यासक्रमात असलेल्या कवित्या त्यांच्या तोंडपाठ आहेत. अनुसया लहानु तळपाडे असं त्यांचं नाव आहे. गुरुवारी होणाऱ्या मराठी भाषा दिनच्या पार्श्वभूमीवर आजीनी कविता म्हटली आहे.

अनुसया तळपाडे यांचा जन्म 1944 मध्ये झाला. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील साकिर वाडी हे त्यांचे जन्म! सध्या त्या सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे राहतात. पहिली ते तिसरीपर्यंतचे शिक्षण त्यांचे साकिरवाडीत झाले. चौथीला शिक्षणासाठी त्या नाशिकला गेल्या. घरची परिस्थिती तशी बेताचीच पण शिक्षणाची आवड निर्माण झाल्याने पुढे शिक्षण घ्यावे, असे त्यांच्या वडिलांना वाटू लागले. त्यानंतर त्यांनी पाचवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यावेळेस पाचवी म्हणजे त्यांची नोकरी लागेल ऐवढे शिक्षण होते. मात्र त्यांनी नोकरी केली नाही. त्यांचे पती म्हणजे लहानु यांनी केवळ मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून नोकरी करुन दिली नाही. पुढे त्यांनी मुलांच्या शिक्षणावर भर दिला. त्यांचा मुलगा नितीन तळपाडे हे करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्राध्यापक आहे.

अनुसया तळपाडे या 75 वर्षाच्या आहेत. तिचे वाचन वेड थक्क करून टाकते, असे नितीन तळपाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.  27 फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर आईला काही कविता येतात का म्हणून विचारले तेव्हा तिने एका मागे एक अनेक कविता म्हणून दाखवल्या. याही वयात तिच्या तोंडपाठ असणाऱ्या कविता ऐकून आम्ही आश्चर्यचकित झालो. मग मला खात्री पटली की "जुन ते सोन" म्हणतात ते खर आहे. वाचनाचे प्रचंड हौस असल्याने आई दिवसातून कितीतरी पान वाचून काढते. आई आमच्यासाठी खूप प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. याही वयात तिने तिचे वाचनवेड जोपासले आहे. यातून आम्ही खूप काही शिकतो, असे तळपाडे यांनी सांगितले.

अनुसया तळपाडे या पंजाबमधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासही गेल्या होत्या. त्यांना पुस्तके खरेदी करण्याची आवड आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Poetry of 75 year old grandmother in Solapur goes viral on social media