मंगळवेढ्यात डाळिंब उत्पादकांची एक कोटी 80 लाख रुपयांची विमा भरपाई अडकली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

 मागील वर्षीच्या खरीप हंगामातील हवामानावर आधारित बहारातील विमा डाळिंब पिकाचा तालुक्‍यातील सात महसूल मंडलातील शेतकऱ्यांनी विमा भरला. त्यातील मंगळवेढा, मरवडे, भोसे या महसूल मंडलातील जवळपास चार हजार 700 शेतकऱ्यांना वंचित ठेवून अन्य महसूल मंडलातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातील रक्कम जमा केली. परंतु, याच हंगामातील मंजूर महसूल मंडलातील शेतकऱ्यांना भरपाई देऊन जवळपास 670 शेतकऱ्यांना विमा भरपाईसाठी मागील चार महिन्यापासून विमा कंपनीने प्रलंबित ठेवले असून त्याची रक्कम जवळपास एक कोटी 80 लाख रुपये आहे.

मंगळवेढा(सोलापूर)ः गतवर्षीच्या हवामानावर आधारित फळपीकचा पीकविमा योजनेतील तालुक्‍यातील 670 शेतकऱ्यांच्या मंजूर पीक विम्याची एक कोटी 80 लाखांची भरपाई देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ केल्याने कंपनी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 

हेही वाचाः उत्पन्न बुडाले, तरीही गरिबांसाठी साडेतीन कोटी रुपये केले खर्च 

मागील वर्षीच्या खरीप हंगामातील हवामानावर आधारित बहारातील विमा डाळिंब पिकाचा तालुक्‍यातील सात महसूल मंडलातील शेतकऱ्यांनी विमा भरला. त्यातील मंगळवेढा, मरवडे, भोसे या महसूल मंडलातील जवळपास चार हजार 700 शेतकऱ्यांना वंचित ठेवून अन्य महसूल मंडलातील शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातील रक्कम जमा केली. परंतु, याच हंगामातील मंजूर महसूल मंडलातील शेतकऱ्यांना भरपाई देऊन जवळपास 670 शेतकऱ्यांना विमा भरपाईसाठी मागील चार महिन्यापासून विमा कंपनीने प्रलंबित ठेवले असून त्याची रक्कम जवळपास एक कोटी 80 लाख रुपये आहे. ही रक्कम देण्यास विमा कंपनीने आजतागायत तरतूद केली नसल्याने विमा भरलेले शेतकरी यंदाच्या हंगामात फळबागाची जोपासना व संगोपन करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले. 
आंधळगाव महसूल मंडलातील शेतकऱ्यांनी हेक्‍टरी आठ हजाराचा विमा हप्ता भरला आणि मंजूर रक्कम 11 हजार हेक्‍टरी भरपाई दिली. त्यामुळे विमा कंपनीच्या भरपाईबाबत शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. या शासनाच्या महावेध या प्रर्जन्यमापन यंत्रावर नोंदलेली आकडेवारीवर कृषी व महसूल खात्याकडे आकडेवारीतील तफावतीचा फटका अन्य महसूल मंडलातील शेतकऱ्यांना बसला आहे. 
नोडल बॅंका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याचप्रमाणे विमा हप्ता अनुदान शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने तीन आठवड्यांत नुकसान भरपाईची रक्कम निश्‍चित करावी. त्यानुसार ही भरपाई शेतकऱ्यांना अदा करणे आवश्‍यक आहे. अन्यथा विमा कंपनीने 12 टक्के दराने विलंब शुल्कासह नुकसान भरपाई लाभार्थीला अदा करावी, अशा सूचना 22 मे 2019 च्या शासन निर्णयातील विमा कंपनीची भूमिका आणि जबाबदारी यामधील मुद्दा क्रमांक 21 नुसार दिल्या आहेत. 

अनुदान मिळताच भरपाई देऊ 
670 मंजूर शेतकऱ्यांच्या विम्यासाठी अनुदानाची रक्कम शासनाने अदा केली नसल्याने ती रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली नाही. अनुदानाची रक्कम प्राप्त होतात त्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात येईल. 
- देवा कोळी, बजाज इन्शुरन्स कंपनी 

आर्थीक अडचणीचा सामना 
आमच्या गावातील बॅंक ऑफ इंडिया तसेच अन्य बॅंकेकडे भरलेले पैसे जमा झाले. पण माझे लक्ष्मी दहिवडी डीसीसी बॅंककडे भरलेल्या पीकविम्याची रक्कम अद्याप न आल्याने बी-बियाणे, डाळिंब पीक धरावयास लागणारा खर्चासाठी अडचणीत आलो. 
- बाळकृष्ण सुडके, डाळिंब पीक शेतकरी, महमदाबाद (शे.) 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pomegranate growers are stuck with insurance compensation of Rs 1 crore 80 lakh